मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धुळे पोलिसांची मदत 👉धुळे जिल्हा पोलीस दलाने दोन लाखांची मदत संकलित करून धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीकांत धिवरे यांनी दिला.
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
एकीकडे राज्यात पावसाने थैमान घातले असताना शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. शिवाय शासनाचेही प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांना प्रतिसाद देत धुळे जिल्हा पोलीस दलाने दोन लाखांची मदत संकलित करून त्याचा धनादेश शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. पोलीस दलाने मदत संकलित करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी धुळे दौऱ्यावर आले होते. दुपारी ठीक दिड वाजता त्यांचे आगमन झाले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. धीवरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हा मदतीचा धनादेश दिला. राज्यात ओला दुष्काळ असल्यामुळे पुष्पगुच्छ न देता हा धनादेश सोपवण्यात आला. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत
धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह पोलिस दलातील सुमारे ५० अधिकारी यांनी आपल्या पगारातून ही मदत संकलित केली आहे. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला मदत जमा करणारे धुळे जिल्हा पोलीस दल राज्यात पहिले ठरले आहे. तर या उपक्रमाचे कौतुक देखील होत आहे.














