बस मधील सापडली पर्स केली परत दिली शाबासकी

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- अजुनही माणुसकी नावाचा धर्म शिल्लक आहे. रस्त्यावर पडलेला एक रुपया देखील आपण उचलुन आपल्या खिशात टाकतो. पण अशीच एक घटना नाशिक ते शिरपूर जाणारी बसमध्ये चक्क आठ लाख किमतीचे दागिने असलेली पर्स शिंदखेडा येथील प्रवाशी अबुजर अलतब तंबोली याला सापडली. लागलीच हया लहान मुलाने सदरील सापडलेली दागिने भरलेली पर्स मालक आजी बाबांना स्वाधीन केली. खरी माणुसकी दाखविल्या बद्दल आजी बाबांनी लहान मुलगा अबुजर हयास पाचशे रुपयाचे बक्षीस देवुन कौतुक करून आभार मानले. हयाबद्दल शिंदखेडा शहरातुन सदर इमानदार लहान मुलगा हयाचे कौतुक केले जात आहे. त्या मुलाने आजच्या तरुण पिढीला जणु एक नवा संदेश दिला आहे.
















