आपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण उधना शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस धावणार
👉 1वाजून 30 मिनिटाला आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवणार उपस्थित राहण्याचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठेचे आव्हान
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत):- आपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण आला असुन आज शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1वाजून 30 मिनिटाला आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचे स्वप्न सर्वसामान्यांसाठी उधना शिंदखेडा ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस* रेल्वे गाडीचे आगमन होणार आहे. हयासाठी मा.ना. श्री. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री भारत सरकार यांनी सदरील जलद रेल्वेला थांबा दिल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार व पणन तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल व माजी केद्रीय मंत्री मा. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आजपासून शिंदखेडा येथे उधना. शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस थांबणार आहे तरी या ऐतिहासिक क्षणाला शिंदखेडा शहर व परिसरातील पदाधिकारी, प्रवाशी नागरिकांसह आपण सर्वांनी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर येऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. असे
रेल्वे प्रवाशी संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष श्री दादा मराठे यांनी यावेळी आव्हान केले आहे.














