*शिंदखेडा येथील ज्ञानज्योती इग्लिश मेडिअम स्कूल ला आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थीची वेशभूषेत पालखी दिंडीची मिरवणूक* शिंदखेडा शहरातील लवकरच उदयास आलेली ज्ञानज्योती इग्लिश मेडिअम स्कूल ज्ञानार्जनासोबत विविध शालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करीत असते. म्हणून दरवर्षी विद्यार्थी संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पालकांचा अधिक ओढ हयाच शाळेविषयी असते. नुकत्याच संपुर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर जाण्यासाठी वारकऱ्यांची संख्या अधिक असते. विठ्ठल रखमाईचे दर्शन घ्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून शिंदखेडा शहरातील ज्ञानज्योती इग्लिश मेडिअम स्कूल ने विठ्ठल रखमाई च्या वेशभूषेत विदयार्थीना तयार करुन वारकऱ्यांची दिंडीप्रमाणेच भजन ताड मृदंगाच्या निनादात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आले प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्याचे शहरवासी व पालकांना वाटू लागले म्हणून शिंदखेडा शहरात अशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाची खमंग चर्चा सुरु होती. हयासाठी शाळेतील मुख्याध्यापक अनिल माळी, उपमुख्याध्यापिका आशा माळी सह शिक्षक शिक्षिका यांच्या अथक प्रयत्न व परिश्रमाने साकार झाले. हयासाठी नेहमीच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण माळी, उपाध्यक्ष प्राध्यापक दिपक माळी सह संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभत असते. हयावेळी पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ✍️ *संपादक यादवराव सावंत शिंदखेडा*



















