Homeताज्या बातम्यापुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष...

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक – नवीन पक्षप्रवेश सोहळा.  ✍️ शिंदखेडा माझा (. संपादक यादवराव सावंत) :-

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी.
👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक – नवीन पक्षप्रवेश सोहळा.                                               ✍️ शिंदखेडा माझा (. संपादक यादवराव सावंत) :-
👉शिवसेना मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिंदखेडा येथे शिवसेनेची बुथ कार्यकर्ता आढावा बैठक शिवसेना महाराष्ट्र सचिव तथा धुळे लोकसभा संपर्क प्रमुख भैय्यासाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. त्यात आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदार यादी संक्षिप्त पुर्नरीक्षण (SIR)यावर काळजीने लक्ष दया.मोहिमेतुन तयार होणाऱ्या यादया म्हणजे पुढील २०-२५ वर्षाची सोय असुन शिंदखेडा मतदार संघातील प्रत्येक गावात शिवसैनिकांची बुथ प्रमुखांची नेमणूक करा.यासाठी आतापासूनच चौकस रहा असे आवाहन संपर्क प्रमुख भैय्यासाहेब चौधरी यांनी शिवसेनेच्या बुथ कार्यकर्ता आढावा बैठकीतुन केले.हयावेळी नव्याने माजी सैनिकांसह, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करून घेतला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. हयाप्रसंगी शिवसेना महाराष्ट्र सचिव तथा धुळे लोकसभा संपर्क प्रमुख भैय्यासाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे,तालुका प्रमुख मयूर बोरसे, शहर प्रमुख सोनू वाघ, युवा सेना शहरप्रमुख महेंद्र वाडिले, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी, माजी सैनिक भुषण पवार, दत्ता शिंदे, सुनील पाटील, भालचंद्र पाटील यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. हयावेळी संपर्क प्रमुख भैय्यासाहेब चौधरी सह,मनोज मोरे, मयुर बोरसे, प्रकाश चौधरी यांनी मार्गदर्शन करत शिंदखेडा विधानसभा मतदार संघात शिवसेना कमकुवत असुन ती मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेऊन जोमाने कामाला लागा. हयावर फक्त सहा महिन्यात शिवसेना शहरासह तालुक्यात गाव तिथे शाखा, शाखाप्रमुख,बुथप्रमुख, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात वाढवून दाखविणार तसेच काही गावात सपुर्ण गाव शिवसैनिक म्हणजे भगवामय वातावरण होईल असे नुकताच मुंबई येथे शिवसेनेचे तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेले माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यावेळी आश्वासन दिले.                                हयावेळी शिवसेनेत माजी सैनिक खानदेशी रक्षक ग्रुप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रजेसिंग गिरासे, प्रमोद जगन्नाथ गुरव ,शांताराम मंगा जाधव, पांडुरंग पवार साहेब, कैलास धुडकू मराठे, सोमनाथ सिताराम बडगुजर यासह मालपुर येथून गायत्री पाटील रावसाहेब पाटील देवी येथून पदमसिंह गिरासे गुलजार सिंग गिरासे तर शिंदखेडा येथून बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर,रमेश चौधरी, रघुनाथ कोळी, महिला वर्गातून शोभाताई पाटील,उषाताई चौधरी, शितल चौधरी, वैशाली चौधरी, गायत्री पाटील यांसह मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळा संपन्न झाला. प्रास्ताविक प्रकाश नाना चौधरी तर सुत्रसंचलन व आभार भुषण पवार यांनी केले.आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777205205.23d98979 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777187137.2186104e Source link

शिंदखेडा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त  डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती

शिंदखेडा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त  डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती.                         ...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.     ...

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत  : 👉भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल मीन्स...

error: Content is protected !!