एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे न्युक्लिअस बजट पुर्तता करुनही लाभापासुन वंचित- नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयावर स्थगित धुळफेक आंदोलन करणार शिंदखेडा माझा ( यादवराव सावंत ) :-
आदिवासी विकास विभाग कडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडुन राबवण्यात येतात. धुळे आदिवासी प्रकल्पात न्युक्लिअस बजेट अंतर्गत योजनाचे फार्म भरुन सर्व कागद पत्राची पुर्तता करुन सुद्धा जि एस टी बिल देउन चार महिने झाले तरी पण आज पर्यंत मंजुर झालेले प्रकरणे वाटप करत केले नाही या प्रकरणाना सात आठ महिने झाले असताना ही अदयाप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, शिरपुर, धुळे तालुक्यातील 150 ते 200 लाभार्थी लाभापासुन वंचित असलेल्या लाभार्थीना आपल्या स्तरावर चौकशी करुन लाभ मिळवून दयावेत. आदिवासी समाजाचा कसा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्हातील सर्वे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळावे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना देण्यात आले होते. जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या चर्चेनंतर तात्काळ शिंदखेडा तालुक्यातील लाभार्थीना लाभ दयावे असे असताना लाभार्थीना राहिलेल्या पुर्तता करण्यास प्रकल्प कार्यालयाकडून सांगितले गेले. त्यानुसार व्यावसायिक दुकानाचे फोटो, स्टम्प ॲफेडिवह, पंधरा टक्के आगाऊ रक्कम पावती देखील फाडली गेलीत. अशी सर्व पुर्तता केल्यावर तात्काळ लाभार्थी च्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. परंतु हया प्रक्रियेस पंधरा ते वीस उलटुनही रक्कम जमा न झाल्याने संत्तप्त लाभार्थी मध्ये धुळे प्रकल्प कार्यालयावर रोष व्यक्त केला असुन स्थगित केलेले आंदोलन शिंदखेडा तालुक्यातील लाभार्थी
आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक
आयुक्त कार्यालयावर भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वात तिव्र स्वरुपाचे धुळफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे .
















