Homeताज्या बातम्याशिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 👉 १२००...

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 👉 १२०० बेडची व्यवस्था देशभरातील नामांकित डॉक्टरांकडुन उपचार मिळणार 

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.                                                          👉 १२०० बेडची व्यवस्था देशभरातील नामांकित डॉक्टरांकडुन उपचार मिळणार 

✍️शिंदखेडा माझा (.संपादक  यादवराव सावंत) :-
शिरपूर येथील एस.व्ही.के.एम.
संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २५ एप्रिल रोजी करण्यात येत आहे.
श्री विलेपार्ले के ळवणी मंडळामार्फत संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी एस. व्ही. के.एम. संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र, खर्दे बु. (ता. शिरपूर) येथे १२०० बेडच्या अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २५ एप्रिल रोजी करण्यात येत आहे.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले आहे. शिरपूर शहरातील अरुणावती नदी काठावरील शनी मंदिर परिसरात खर्दे बुद्रुक शिवारात या हॉस्पिटलचे काम सुरू आहे. या हॉस्पिटलमार्फत रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३५० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. विविध प्रकारचे आजार व रोगांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार असल्याने व देशभरातील नामांकित डॉक्टर्समार्फत उपचार मिळणार असून जटील शत्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता शिरपूर विमानतळावर आगमन होईल. येथे स्वागत झाल्यानंतर एस.व्ही. के.एम. इंजिनिअरींग कॉलेजचे दुपारी ३.२५ वाजता उद्घाटन व पाहणी, दुपारी ३.४८ वाजता कृष्णा कोटेक्स (वर्ल्ड क्लास) व डाय हाऊस आगमन, उद्घाटन व पाहणी, दुपारी ४.२१ वाजता प्रथ टेक्सटाईल व एसेरोला येथे आगमन व उद्घाटन (एकाच ठिकाणी) व पाहणी, त्यानंतर सायंकाळी ४.५६ वाजता नर्सिंग कॉलेज, खर्दे येथे उदघाटन होईल. यानंतर स्व. तपनभाई पटेल मेमोरीयल हॉस्पीटल (खर्दे) उद्घाटन सोहळा सायंकाळी ५.०८ वाजता होऊन पाहणी करतील. यानंतर आर.सी.पटेल फॉर्मसी कॉलेज ग्राऊंड, शिरपूर येथे सायंकाळी ७ वाजता जाहीर कार्यक्रम होईल. या ठिकाणी स्टेजवरुन व्हर्चुअल अॅग्रीकल्चर कॉलेज व फॉर्मसी कॉलेज तरडी, आर.सी. पटेल इंग्लिश मेडियम स्कूल, निमझरी नाका शिरपूरचे उदघाटन होईल. तसेच स्टेजवरुन वर्चुअल (सुदूर यंत्रणेद्वारे) भूमिपूजन समारंभ होईल. देवमोगरा माता मंदिर, नटवाडे, इंटरनॅशनल मोटर ड्रायव्हींग स्कूल, दहिवद येथील भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जनकव्हिला, शिरपूर येथे मुक्काम करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776607698.5cfebb07 Source link

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.  👉 १२०० बेडची...

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.                           ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776589654.5b96dfb9 Source link

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

error: Content is protected !!