शिंदखेडा व नरडाणा पोलिसांची धडक कारवाई -👉 प्रतिबंधित पानमसाला व सुगंधीत तंबाखूचा दोन ट्रकांसह 1 कोटी 93 लाखांचा मुद्देमाल जप्त
✍️शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) :-
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत राज्यात बंदी असलेला पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा साठा पकडला आहे. नरडाणा आणि शिंदखेडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन आयशर ट्रकांसह तब्बल 1 कोटी 92 लाख 99 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती अशी की, दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोविंद पेट्रोल पंप, सार्वे शिवार, ता. शिंदखेडा येथे पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, आयशर मोटार ट्रक क्रमांक MP 13 GB 2822 आणि MH 27 DT 1343 या दोन गाड्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विविध ब्रँडचे पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू आढळून आले. सदर वाहनांमधून प्रिमियम राजनिवास पानमसाला, प्रिमियम जाफरानी जर्दा सुगंधीत तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, आणि शॉट 999 लक्झरी च्युईंग टोबॅको अशा मालाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या मालाची एकूण किंमत जवळपास 1,92,99,040 रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपी अमजद अजिज खान (वय 43, रा. मोहननगर, रतलाम, मध्यप्रदेश) आणि असफाक अब्बास खान (वय 47, रा. राजगड, जि. धार, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी धुळेकडे चोरटी वाहतूक करून विक्री करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 123, 274, 275, व 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले करत आहेत. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सपोनि हनुमंत गायकवाड, तसेच पो.उ.नि. रविंद्र महाले, विजय आहेर, अजय सोनवणे, गणेश पाटील, रईश शेख, ललित पाटील, भरत चव्हाण, नारायण गवळी, योगेश गिते, भुरा पाटील, अनिल सोनवणे, भोई, अर्पण मोरे, सचिन बागुल आणि चौधरी या पोलिसांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.या यशस्वी कारवाईमुळे धुळे पोलिसांनी पुन्हा एकदा राज्यात बंदी असलेल्या पदार्थांच्या तस्करीवर प्रभावी प्रतिबंध घातल्याचे सिद्ध केले आहे.















