शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.
✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी
👉👉शहादा : शहाद्यातील नामांकित चावरा इंग्लिश स्कूलच्या चौकशीचा विषय सुरू असताना राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी धनराज दरबारसिंग राजपूत (डी. डी.) यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा शिक्षण विभागातील ५१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढले. सन २०२५-२६ या निवड सूची वर्षांमध्ये जिल्हा तांत्रिक सेवेमधील विस्तार अधिकारी संवर्गातील ५१ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा गट – ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. यामध्ये डी डी राजपूत यांचा समावेश आहे.
शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सध्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्याकडे होता. आता या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून श्री. राजपूत लवकरच या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, श्री. राजपूत यांनी याआधी शहादा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम केले असून, आता गटशिक्षणाधिकारी म्हणून ते परत या ठिकाणी येत आहेत.












