नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात प्रा.ढाके यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार. ✍️ संपादक यादवराव शिंदखेडा माझा
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे: ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत कै. एम. डी. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. पी. ढाके यांचा सेवापुर्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष बाबासो. संजयकुमार मधुकरराव सिसोदे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करुन त्यांना सुखी, शांती, समृद्ध व आरोग्यदायी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, सत्कारमुर्ती प्रा. डॉ. एस. पी. ढाके तर सभागृहात वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. .कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासो. संजयकुमार सिसोदे यांनी सत्कारमुर्ती प्रा. डॉ. एस. पी. ढाके यांना संस्थेविषयी असलेला जिव्हाळा, कामातील प्रामाणिकपना व संस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव उद्गार काढले व त्यांना सुखी व आरोग्यदायी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. गिरासे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीसाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे असते. सत्कारमुर्ती प्रा. ढाके यांनी आपल्या वाट्याचे नियमित अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे केले तसेच संस्था व महाविद्यालयाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडल्यामुळे ते समाधानी आहेत. उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे व आर. ओ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सत्कारमुर्ती प्रा. ढाके यांनी यावेळी संस्था व महाविद्यालयाने सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील तर प्रा. डी. एस. ढिवरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अमोल महिरे, प्रा. निखील भावसार, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे व शशिकांत भामरे यांनी परीश्रम घेतले.















