*बिनविरोध निवडीने काहींना मिर्ची लागली. तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू, असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला*
*धुळे येथे महानगरपालिका प्रचारार्थ सभा* ✍️
शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- – धुळे महापालिकेवर भाजपाला सत्ता केवळ महापौर बसविण्यासाठी नको आहे. आम्हाला शहर बदलवायचे आहे, धुळ्याला आधुनिक शहर म्हणून स्थापित करायचे आहे, धुळ्यात पुन्हा एकदा भगव्याचे राज्य आणण्यासाठी निवडणूक जिंकायची आहे; असा जाहीर निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात व्यक्त केला आहे. शहरातील कालिका माता मंदिराजवळ भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
येथील महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७४ पैकी ६३ जागांवर उमेदवार दिले आहेत. यापैकी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत चार उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता निवडणूक रिंगणात पक्षाचे ५९ उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. दुपारी २.४० वाजता त्यांचे सभास्थळी आगमन झाले. शहरातील
पांझरा नदीकाठी श्री कालिकामाता मंदिर चौकात झालेल्या या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, संघटन महामंत्री विजय चौधरी, रवि अनासपूरे, आ. अनुप अग्रवाल, आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, आ. राम भदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, रामकृष्ण खलाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, दोंडाईचा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, पिंपळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता चौरे, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, संजय शर्मा, डॉ. सुशिल महाजन, महादेव परदेशी,
अल्पाताई अग्रवाल यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
१ कोटी महिलांना करणार लखपती दीदी !
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता आम्हाला केवळ लाडक्या बहिणी ठेवायच्या नाहीत. त्यांना लखपती दीदी बनवायचे आहे. महाराष्ट्रात ५० लाख लखपती दीदी आम्ही केल्या. आता चार महिन्यात आणखी ५० लाख म्हणजे १ कोटी लखपती दीदी आम्ही करू. हा आकडा थांबणार नाही. धुळ्यात भाजपाचा महापौर बसल्यानंतर मी येईल. तेव्हा पालकमंत्री, आमदार, महापौरांना नक्की विचारेल की, धुळ्यात किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केले. तसेच होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो, त्यांना टास्क देतोय
१ कोटी लाडक्या बहिणींना करणार लखपती दीदी !
माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. मला धुळे शहर बदलायचे आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. पाच वर्षे धुळ्याची चिंता तुमचा देवाभाऊ करेल; असे म्हणत देवाभाऊंनी उपस्थित लाडक्या बहिणींना आश्वस्त केले.
बिनविरोध निवडीवरुन साधला निशाणा !
चळ पचे नार ही बौर की बदी य,
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, धुळेकरांनी कमाल केली आहे. सुरवातीलाच चौकार मारत चार नगरसेवक बिनविरोध केले. या बिनविरोध निवडीने काहींना मिर्ची लागली. तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू, असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला. तसेच
बिनविरोध नगरसेवक…
देशाच्या लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी ३३ खासदार काँग्रेसच्या काळात बिनविरोध झाले होते. खासदार बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि नगरसेवक बिनविरोध आले तर लोकशाहीचा खून, असे म्हणणाऱ्यांचे डोके कुठे आहे? असा रोकडा सवालही त्यांनी विचारला.
फडणवीसांनी वाचली भाजपाची यशोगाथा !
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, धुळे शहर व जिल्ह्याला उज्वल इतिहास आहे. हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून एकीकडे मध्यप्रदेश तर दुसरीकडे गुजरात आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असतानाही अनेक वर्षे या शहरात अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली.
मात्र २०१४ नंतर भाजपाच्या सत्ताकाळात धुळे शहराने खऱ्या अर्थाने विकास पाहिला. पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाचा संकल्प घेऊन मी येथे आलो आहे. धुळे शहराच्या पाणीप्रश्नासाठी १७० कोटी रुपयांची अक्कपाडा योजना मंजूर केली. सुध पूर्वी दहा दिवसांनी पाणी मिळायचे, आता दोन दिवसाआड पाणी मिळत आहे. मात्र धुळेकरांना चोवीस तास पाणी देण्याचे आमचे स्वप्न आहे. तापी योजनेची जुनी पाईपलाईन बदलविण्याची मागणी सुद्धा आमदार अग्रवाल यांनीच केली आहे. त्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठीच मी येथे आलो आहे. मोदींच्या काळात प्रथमच स्मार्ट सिटी, शहर विकास योजना, अमृत योजना, आवास योजना अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या. हजारो कोटी रुपयांचा निधी थेट शहरांच्या विकासासाठी देण्यात आला. याच धोरणामुळे धुळे शहरालाही हजारो कोटी रुपये देता आले. शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. मोदींनी स्पष्ट निर्देश दिले की शहरातील बेघर आणि अतिक्रमणधारकांना पक्की घरे द्यावीत. त्या धोरणानुसार देशभरात तीस लाख लोकांना पक्की घरे देण्यात आली. धुळे शहरातही आमदार अग्रवाल यांच्या मागणीनुसार बेघर आणि अतिक्रमणधारकांना जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा दिला जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून दिली जातील. प्रत्येकाला घर मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच सांडपाणी थेट नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत होते. त्यासाठी भुयारी गटार योजना आणण्यात आली. अमृत २ योजनेतून पाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
काँग्रेसच्या काळात शहर बेहाल !
काँग्रेसच्या काळात धुळ्याला पन्नास कोटींचाही निधी मिळत नव्हता. मात्र मोदी सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आमदार अग्रवाल हे दर पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या मागण्या घेऊन येतात आणि आम्ही त्यांना कधीही खाली हात पाठवत नाही. मोहाडी ट्रक टर्मिनस, महिलांसाठी स्वतंत्र मार्केट, भाजी मंडई, एकविरा देवी मंदिर परिसरात पंधरा कोटी रुपयांतून घाट निर्मितीचे काम सुरू आहे. शहरातील कचऱ्याचे डम्पिंग आता बंद करायचे आहे. कचऱ्याची विल्हेवाट वैज्ञानिक पद्धतीने लावली जाणार आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि खत निर्मिती असे विविध प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. धुळे शहरातही असा आधुनिक प्रकल्प उभारला जाणार आहे. सहा राष्ट्रीय महामार्गामुळे धुळे शहर आता अधिक महत्त्वाचे बनले आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत धुळ्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धुळे एमआयडीसीसाठी दोन हजार एकर जागा मिळवताना अडचणी येत आहेत, मात्र ती जागा मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. शिवाय धुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम पुढील टप्प्यात हाती घेतले जाईल. कारण जिथे विमानतळ असतो तिथे उद्योग येतात. आता आपल्याला धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचे आहे. भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावे लागेल. आणि वर्तमान बदलण्याची ताकद केवळ मोदीजींमध्येच आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.















