Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री फडणवीसांचा दाजीसाहेबांच्या लोकशाहीवादी कार्याचा गौरव.   👉दाजीसाहेबांचे स्वप्न कुणाल पाटील पूर्ण करतील;...

मुख्यमंत्री फडणवीसांचा दाजीसाहेबांच्या लोकशाहीवादी कार्याचा गौरव.   👉दाजीसाहेबांचे स्वप्न कुणाल पाटील पूर्ण करतील; सरकारची ताकद पाठीशी; मुख्यमंत्री फडणवीस.                                           

मुख्यमंत्री फडणवीसांचा दाजीसाहेबांच्या लोकशाहीवादी कार्याचा गौरव.                         👉दाजीसाहेबांचे स्वप्न कुणाल पाटील पूर्ण करतील; सरकारची ताकद पाठीशी; मुख्यमंत्री फडणवीस.                   

✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
खान्देशचे लोकनेते, जनतेचे लाडके नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या – प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहरात भावपूर्ण वातावरणात अभिवादन व जनसेवा पुरस्कार सोहळा पार पडला. शहरातील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला भव्यदिव्य रूप प्राप्त झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दाजीसाहेबांच्या आठवर्णीना उजाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या स्मरण सोहळ्यात दाजीसाहेबांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, दाजीसाहेब हे सतेत मंत्री असूनही
विरोधी पक्षाचे म्हणणे धीराने ऐकून घेत आणि प्रश्नांना न्याय मिळवून देत असत. सभागृहात त्यांचा हा लोकशाहीवादी चेहरा आम्ही अनुभवला. राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजहिताला प्राधान्य देणे हेच त्यांचे खरे नेतृत्व होते.
कुणाल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास मुख्यमंत्री म्हणाले की, दाजीसाहेवांचे खान्देशाच्या विकासाबाचत अपूर्ण राहिलेले स्वप्न आता कुणाल बाचा यांच्या नेतृत्वातून पूर्णत्वास येईल. आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. कुणाल पाटील हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता व्यापक दृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला बळकटी देणे ही आमची जबाबदारी आहे.
फडणवीस यांनी खान्देशाच्या विकासाचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, हा भाग शेतीसाठी महत्वाचा आहे, मात्र उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठीही प्रचंड संधी
येथे आहेत. त्यामुळे शासनाची पावले केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता औद्योगिक विकासाकडेही भक्कमपणे टाकली जातील. अकलपाडा प्रकल्पासह अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून दाजीसाहेवांच्या स्वप्नातील विकास साध्य केला जाईल. पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव
या सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरलेले पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदिवासी, वंचित समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या या समाज सेवकाच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी कडकडाटी टाळ्यांच्या गजरात उभे राहून त्यांना मानाचा मुजरा दिला.
या स्मरण सोहळ्यास राज्यातील आणि केंद्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये मध्य प्रदेशचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार स्मिता वाघ, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, लताताई पाटील, विनय पाटील आदींसह जिल्ह्यातील मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला दाजीसाहेबांच्या आठवणींनी भारावलेले वातावरण लाभले. जनतेच्या मनात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतिदिनी उपस्थित सर्वांनी त्यांच्या आदर्शाप्रती नवा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाम आश्वासनामुळे दाजीसाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्णत्वास नेण्याची नवी ऊर्जा आणि विश्वास जनतेच्या मनात दृढ झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!