सुकवद पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी अखेर पुर्वरत. 👉 शिंदखेडा शहराची पाणी टंचाई संपणार बुराई नदी पात्रात पाणी दाखल. 👉 उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांचे मोलाचे सहकार्य .
शिंदखेडा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुकवद येथील तापी नदीच्या विहिरीचा वीज पुरवठा ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला होता.
या दरम्यान बुराई नदी पात्रातील विहिरीतून पाणीपुरवठा सुरू होता. परंतु आता हा जलसाठा संपल्याने सुकवद ची योजना तात्काळ सुरू करणे अत्यावश्यक होते. महावितरणने 2 जानेवारी 2026 रोजी पाठविलेल्या बिलात 43 लाख रुपये थकल्याचे नमूद केले आहे.
पाण्याची गरज लक्षात घेता नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी आणि नगरसेवक यांच्या सूचनेनुसार 13 जानेवारी रोजी एक लाख रुपये भरण्यात आले.
महावितरण कंपनीने अजून बिल भरण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायतीकडे मर्यादित निधी शिल्लक असताना देखील अत्यावश्यक भाग म्हणून 19 जानेवारी रोजी पुन्हा चार लाख रुपये थकीत वीज बिलात भरण्यात आले.
उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मोलाचे सहकार्य केले.
नामदार अजित पवार यांनी ऊर्जा विभागाचे सेक्रेटरी लोकेश चंद्रा यांना आदेश दिले. या घडामोडीत जिल्हाधिकारी यांना देखील विनंती करून खंडित वीज पुरवठा सुरळीत करणेबाबत पत्र दिले.
वीजपुरवठा सुरळीत होऊन पाण्याची चाचणी घेत असताना तालुक्यातील 85 गाव पाणी योजनेच्या कामात आपल्या शहराच्या योजनेचे पाईप तुटल्याचे निदर्शनास आले.
त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले. आज 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाईप जोडण्यात आले असून बुराई नदीच्या पात्रात पाणी दाखल झाले आहे.
यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे, सुभाष माळी, नगरसेवक प्रा.दीपक माळी, अर्जुन भिल, पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे, पाणीपुरवठा कर्मचारी सह काल भाजपचे गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, उपगराध्यक्ष उदय देसले,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे, नगरसेवक सूयोग भदाणे व इतर नगरसेवक वीज जोडणी ठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान नागरिकांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केले आहे.















