Homeताज्या बातम्यासुकवद पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा संडित, नगरपंचायत प्रशासनाच्या निष्कियतेचा कळस- 43 लाखाहुन अधिक...

सुकवद पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा संडित, नगरपंचायत प्रशासनाच्या निष्कियतेचा कळस- 43 लाखाहुन अधिक थकबाकी 👉 नगराध्यक्षा कलावती माळी यांनी पत्रकार परिषदेतुन केला खुलासा

सुकवद पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा संडित, नगरपंचायत प्रशासनाच्या निष्कियतेचा कळस- 43 लाखाहुन अधिक थकबाकी
👉 नगराध्यक्षा कलावती माळी यांनी पत्रकार परिषदेतुन केला खुलासा.                                   ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत )
शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवद येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दि. २९ ऑगस्ट २०२५ वीजबील थकल्यामुळे खंडित झाले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट २०२५ पासून रु.४३,३५,७७०/- एवढे वीजबील थकीत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीपुरवठा होणार कि नाही हयासाठी पाणी जपून वापरा असे शहरातील नागरिकांना आवाहन करत संबधित थकीत बिलाविषयी चौकशी करून योग्य तो मार्ग काढू असा खुलासा पत्रकार परिषदेतुन नगराध्यक्षा कलावती माळी व नगरसेवक प्रतिनिधी यांनी यावेळी पत्रकारांना केला. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस जन संपर्क कार्यालयात शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती माळी सह नगरसेवक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होती. सदरच्या पत्रकार परिषदेतून खालील महत्त्वपूर्ण गंभीर विषयावर नगराध्यक्षा श्रीमती माळी यांनी खालील प्रमाणे सदर विषयावर आपले म्हणणे मांडले कि,शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवद येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दि. २९ ऑगस्ट २०२५ वीजबील थकल्यामुळे खंडित झाले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट २०२५ पासून रु.४३,३५,७७०/- एवढे वीजबील थकीत आहे.
वीजबील हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अथवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जाते. दरम्यान च्या काळात प्रशासक असलेने निधी अप्राप्त आहे. आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काहीही प्रयत्न झालेले नाहीत.
सद्यस्थितीत शहराला बुराई नदी मधून पाणी पुरवठा होत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून बुराई बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झाला आहे. परिणामी सुकवद येथील पाणीपुरवठा सुरु करणे अत्यावशक बनले आहे.
तथापी, वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर, शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. पॅनलप्रमुख राकेश माळी, गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम रु.१,००,०००/- थकीत वीजबील भरण्याचा सूचना केल्या आहेत. दि. १७/०१/२०२५ रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हयावेळी नगराध्यक्षा कलावती माळी सह नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, अरुण देसले, नगरसेवक अर्जुन सोनवणे,नगरसेविका कमलाबाई पाटोळे, स्विकृत नगरसेवक प्रा. दिपक माळी, प्रकाश चौधरी,मनिष माळी, वैभव गुरव, पदाधिकारी व कार्यकर्ते आदीसह शहरातील पत्रकार उपस्थित होते. तसेच शहरातील नागरिकांनी सध्या पाणी जपून वापरा असे हयावेळी नगराध्यक्षा यांनी सांगितले. सुमारे ४३ लाखाहुन अधिक रुपायाची वीजबिल थकबाकी असल्याने ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला आहे पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असताना इतकी मोठी रक्कम साचू देणारे नगरपंचायत प्रशासन नेमके करत होते तरी काय असा संत सवाल आता शिंदखेडा शहरातील नागरिक विचारात आहे महिन्यानंतर महिने वीज बिल न भरता थकबाकी वाढत गेली तरीही मुख्याधिकारी प्रशासक गप्प का होते वीज वितरण कंपनीकडून नोटीसा पत्रव्यवहार इसाय येत असतानाही केवळ पुढे पाहू च्या धोरणावर कारभार चालवण्यात आला का हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे वीज कनेक्शन तोडले जाईपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न करणे म्हणजे जनतेच्या पाण्याशी थेट खेळ केल्यासारखे आहे आता आज वीज नाही पाणी नाही आणि सर्वसामान्य नागरिक मात्र टँकर,खासगी विहिरी व महागड्या पर्यायांच्या दयेवर आहेत. मात्र या परिस्थितीस जबाबदार असलेल्यांवर एक शब्दाचीही कारवाई नाही, हीच शोकांतिका आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेत अशी बेजबाबदारपणा, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळपणा परवडणारा नाही. *४३ लाखांची थकबाकी एका दिवसात निर्माण झाली नाही, मग याआधी जबाबदारी निश्चित का झाली नाही? दोषी अधिकारी,कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरणावर पडदा टाकला जाणार?*
शिंदखेडा नगरपंचायतीने तातडीने थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करावा,*तसेच या गैरकारभारास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे.* अन्यथा हा प्रश्न पाण्याचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ठरेल, हे लक्षात ठेवावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!