शिंदखेडा येथे कल्पतरू लोकसंचालित साधन केंद्राची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
✍️शिंदखेडा माझा(यादवराव सावंत) :-
शिंदखेडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित कल्पतरू लोकसंचालित साधन केंद्र शिंदखेडा सीएमआरसी ची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिंदखेडा येथील बिसाजनी मंगल कार्यालयात 700 महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अँड. चंद्रकांत येशीराव MSEB ग्राहक गऱ्हाणे निवारण मंच पॅनल जज धुळे, संगीता पाडवी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा, चंद्रकिरण शिसोदे संरक्षण अधिकारी शिंदखेडा, दर्शना पवार सामाजिक कार्यकर्त्या, शैलेश पाटील विभागीय सल्लागार माविम, जगन्नाथ वानखेडकर जिल्हा समन्वय अधिकारी धुळे, तुषार लासुरे एचडीएफसी ब्रांच मॅनेजर, संजय महाजन , मिलिंद पाटील सनियंत्रण अधिकारी धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कल्पतरू सीएमआरसी अध्यक्ष सुरेखा राजेंद्र देसले यांनी भूषविले.
सुरुवातीला या आर्थिक वर्षात देशाच्या सीमेवर मयत झालेले जवान नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पावलेले निष्पाप मनुष्य प्राणी व पूरग्रस्त भागात मदत झालेले सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सामुदायिक प्रार्थना म्हटली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून दिप्रज्वलन मान्यवरांनी केले. वारुड येथील मुलींनी स्वागतगित गायिले.सदर कार्यक्रमात बचत गटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या बचत गटांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या आर्थिक वर्षात सर्वात मोठे कर्ज प्राप्त गटांना कर्ज चेक वितरीत करण्यात आले. मावीम मित्र मंडळाच्या समाज सुधारक पुरुष सन्मान कार्यक्रमातील मान्यवरांचे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळेत उपस्थित मान्यवरांमध्ये संगिता पाडवी मॅडम व शिसोदे मॅडम, श्रीमती दर्शना पवार,शैलेश पाटील, यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. मागील तीन वर्षापासून नियुक्त कार्यकारिणी राजीनामे देत नवीन कार्यकारिणी येणाऱ्या पंधरा दिवसात जाहीर करण्याचा निर्णय घेतला व सोबत धर्मादाय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय देखील सदर सभेत घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ वानखेडकर सर व प्रियंका ठाकूर यांनी केले तर आभार संदीप पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नपूर्णा सावंत व रत्ना पाटील यांनी सहकार्य केले.















