माझ्या शेतात येवून बदनामी करुन खोटा आरोप करणाऱ्या एकनाथ खैरनार व संदेश जैनावर गुन्हा दाखल करेल : माजी पं.स. सदस्य प्रविण मोरे
✍️ शिंदखेडा माझा संपादक (यादवराव सावंत)

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील शेतकरी व माजी पंचायत समिती सदस्य प्रविण मोरे यांच्या शेतात एकनाथ भास्कर खैरनार येवून माझी शेती आहे. माझ्या शेतातील मका जाळून टाकला, पाण्याची पाईपलाईन फोडून टाकली, काल रोजी माझ्यासोबत परिवारातील तीन जन शेतात पाहणी केली असता, त्याठिकाणी काही आढळून आले नाही, फक्त एका कोपऱ्यावरील मक्याचे पीक त्यांनीच जाळला होता असे दिसून आले. तरी आमच्यावर खोटा आरोप केला आहे. वालखेडा व बेटावद रोडवरील काही अंतरावर बारा एकर शेत जमीन माझी आहे. सोनगीर येथील अवैध सावकार संदेश प्रेमचंद जैन यांच्याकडून सन २०१२ मध्ये व्याजाने वीस लाख रुपये २ टक्के प्रमाणे घेतले. पैसे घेण्याच कारण माझ्यावर कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी घेतले होते. संदेश प्रेमचंद जैन यांच्याकडे सहा बिगा शेती नावावर करून दिली. पुर्ण पैसे देईपर्यंत शेती तुमच्या नावावर राहिल असे तोंडी बोलणे होवून मध्यस्थी समोर हा विषय झाला होता. अवैध सावकार संदेश प्रेमचंद जैन यांना वीस लाख व व्याज दहा लाख असे तीस लाख दिल्याने देवाण आहे. माझ्या शेतात येवून बदनामी करून घेवाण होवून व्यवहार पूर्ण झाले. परंतु, अवैध सावकार संदेश जैन यांने ३ टक्केने पैसे मागत आहे. तीस लाख रुपये देवूनही माझ्याकडे दहा लाखांची मागणी करित आहे. त्यांने मला विश्वासात न घेता, कुठल्याही प्रकारे न सांगता संदेश जैन यांने वाघाडी येथील एकनाथ भास्कर खैरनार यांच्याशी शेतीचा व्यवहार करून घेतला. मात्र, पैसे घेण्यापूर्वी असं काही विषय झाला नव्हता. परंतु, राजकीय फायदा घेवून संदेप जैन येणे जाणून बुजून हा व्यवहार केला. संदेप जैन यांच्या विरोधात सहकार विभागात तक्रार दाखल केली आहे. त्याठिकाणी दोन ते तीन सुनावणी झाली. त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. म्हणून संदेश जैन हा जाणून बुजून त्रास देत आहे. मात्र, संपूर्ण बारा एकर बागेची जमीन ही माझी आहे. जमीनीवर पिक पेरणी केली आहे. रोज माणस लावून पाणी देण्यापासून ते वखरणी, निंदनी, कोळपनीसह इतर कामे करित आहे. हा एकनाथ खैरनार सांगतो की, माझ्या शेतातील मका प्रविण मोरे व त्यांच्या चिरंजीव यांनी जाळला आहे. परंतु, गेल्या तीन दिवसापासून लग्न समारंभ सुरू आहे. आम्ही घरी नाही, रोज कुठे ना कुठे लग्न, मौत याठिकाणी जात आहे. शेतात माणसं नाही, आम्ही स्वतः नाही. परंतु, एकनाथ खैरनार हा खोटा आरोप करत आहे. तरी माझी बदनामी करुन आमच्यावर खोटा आरोप करित मानसिक त्रास देत आहे. असे प्रविण मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येणाऱ्या दोन दिवसात प्रशासनाने एकनाथ खैरनार, अवैध सावकार संदेश जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल नाही केला. तर मी स्वतः आत्मदहन करेल असा इशारा देत याला सर्वस्वी जबाबदार सरकारी खाते, पोलिस प्रशासन राहील असे त्यांनी सांगितले.













