Homeताज्या बातम्याप्रकाशात सुरू होतीस खुलेआम गुटखा विक्री; ‘अन्न व औषधी’च्या पथकाने धाड टाकून...

प्रकाशात सुरू होतीस खुलेआम गुटखा विक्री; ‘अन्न व औषधी’च्या पथकाने धाड टाकून केला पर्दाफाश

प्रकाशात सुरू होतीस खुलेआम गुटखा विक्री; ‘अन्न व औषधी’च्या पथकाने धाड टाकून केला पर्दाफाश

✍️ लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी शिंदखेडा माझा पोर्टल न्युज                                  👉शहादा तालुक्‍यातील गावागावांत छोटी- मोठी किराणा दुकाने आणि टपऱ्यांवर खुलेआम सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषधी प्रशासन विभागाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या विभागाच्या पथकाने प्रकाशा शहरात धाड टाकून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषधी प्रशासनाने राज्याच्या विविध विभागात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवायांना गती दिली आहे. याच अनुषंगाने शहादा तालुक्यातील प्रकाशा शहरातही प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती या विभागाला मिळाली होती. त्यानुसार ‘अन्न व औषधी’च्या पथकाने सापळा रचून शहरातील आंबेडकर नगर भागातील गणेश शंकर अहिरे या व्यक्तीच्या वेळी व राहत्या घरी गोपनीय माहितीच्या आधारे झाड टाकली. यावेळी या पथकाला गणेश अहिरे याने केशर युक्त विमल पान मसाला, व्ही – १ सुगंधित पान मसाला, तानसेन सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखूच्या पुड्या असा एकूण तीन हजार ९८६ रुपयांचा गुटखा व संबंधित पाल मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे आढळले. पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी संकेत आबा सदाफुले यांच्या तक्रारीवरून गणेश शंकर अहिरे (५१, वॉर्ड क्र. ३, आंबेडकर नगर, प्रकाशा) याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये प्रतिबंधित पदार्थ बाळगून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदुरबार  जिल्ह्यात अवघ्‍या १० तासात दोन अपघात; नियोजित नवरदेवासह तीन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू;  ...

नंदुरबार  जिल्ह्यात अवघ्‍या १० तासात दोन अपघात; नियोजित नवरदेवासह तीन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू;                       ...

अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त   ✍️ लाला चव्हाण शहादा वडाळी प्रतिनिधी, शिंदखेडा माझा पोर्टल न्युज  नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777024050.9ce612a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777005901.be6a35b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1776987849.a9d90b8 Source link

error: Content is protected !!