नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात सेवा पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत) :-
नरडाणे येथे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचा 75 वा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रदेश भाजपचा सेवा पंधरवडा अभियान राबविण्याचा संकल्प आणि पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे ना. जयकुमारजी रावल व श्री. बापूसाहेब खलाणे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार श्री सिद्धार्थ सिसोदे व ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत कै. एम. डी. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा पंधरवडाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन बाबासाहेब संजय सिसोदे यांनी भूषविले. याप्रसंगी ताईसो सौ.संजीवनी सिसोदे, नरडाणा पोलिस स्टेशनचे एपीआय एन.आर.मोरे, पीएसआय श्री.विजय आहेर, दादासो. सिद्धार्थ सिसोदे, माळीच आश्रम शाळा चेअरमन श्री. विश्वास पाटील, प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, नरडाणा मंडळ अधिकारी स्वाती वाघ मॅडम व मंडाळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक सागर पाटील, नरडाणा प्रा.आ.केंद्राचे चेतन चौधरी व सुदर्शन चव्हाण, माजी सैनीक निलेश देवरे आदी तर सभामंडपात वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता म. गांधीजी व स्व. पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. स्वच्छतेला प्रोत्साहन म्हणून उपस्थित मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी यांच्या सहभागातून महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यानंतर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी ‘रन फॉर मोदी’- मॅरेथॉन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. एपीआय श्री. एन. आर. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन वेसनमुक्तीची शपथ दिली, ग्रामसेवक सागर पाटील यांनी स्वच्छतेची शपथ दिली, श्री.चेतन चौधरी यांनी मरणोत्तर अवयदान शपथ दिली. प्राचार्यां डॉ. गिरासे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन युवकांचा राष्ट्रनिर्माण कार्यातील सहभाग याविषयी मार्गदर्शन केले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना दादासो. सिद्धार्थ सिसोदे यांनी मरोणत्तर अवयवदानाबद्दल मनोगत व्यक्त करुन अत्यंत कमी वेळात सर्वसमावेशक व उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संयोजक व स्पर्धकांना धन्यवाद दिले, ताईसो सौ. संजीवनी सिसोदे यांनी सर्व मान्यवर व प्रशासकीय अधिकारी यांनी कार्यक्रमात उपस्थिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील यांनी तर आभार प्रा. डी. एस. ढिवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, प्रा. अनिता मोरे, प्रा.सारीका पाटील, प्रा. सोनाली शिंदे, प्रा. अमोल महिरे, प्रा. गिरीष पवार, प्रा. राहूल जाधव, प्रा.योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, प्रा.रोहिनी सिसोदे, आर. ओ. पाटील, प्रशांत सिसोदे, फारुक कुरेशी, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शंकर सिसोदे यांनी परीश्रम घेतले.















