दोंडाईचा नगरपालिकेच्या बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षा मॉसाहेब सौ. नयनकुंवरताई रावल यांच्यासह सर्व 26 बिनविरोध नगरसेवकांनी आज पालिकेच्या सभागृहात जावून आपला पदभार स्विकारला.

पदभार स्विकारण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले, तेथून ढोलताश्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत नगरपालिकेत प्रवेश केला, अध्यक्षांच्या दालनात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून नगराध्यक्षांना खुर्चीवर विराजमान केले. यावेळी लोकनेते सरकारसाहेब रावल, सौ.सुभद्रादेवी जयकुमार रावल, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ.धरतीताई देवरे, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख,बाजार समितीचे सभापती नारायण पाटील,भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, गटनेता निखील जाधव, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मुकेश गणसिंग देवरे, कुकरेजा रविना महेशकुमार, सोनवणे सरलाबाई छोटू ,शेख शिबान अहमद रियाज अहमद, चव्हाण अक्षय वसंत ,बागवान सुपीयाबी मेहमुद, नगराळे कल्पनाबाई गोपाल, पिंजारी शेख नबु शेख बशिर, पाटील विजय जिजाबराव , मराठे भारती विजय, कागणे वैशाली शरद , सुभाष कांतीलाल धनगर, रामोळे देवयानी संजोग , पाटील चतूर जिभाऊ, गिरासे नरेंद्र नथ्थुसिंग , अग्रवाल राणी राकेश, महाजन वैशाली प्रविण , निखीलकुमार रविंद्रसिंग जाधव, चौधरी अपूर्वा चिरंजीवी , गिरासे जितेंद्र धनसिंग, महाले भावना हितेंद्र , देशमुख रविंद्र भास्कर, भिल सरजू वेडू , बागुल सुवर्णा युवराज, ठाकुर भरतरी पुंडलिक, गिरासे ललिता जितेंद्र आदी नगरसेवक यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दोंडाईचा शहरात एकाच पक्षाचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध झाल्यामुळे संपूर्ण देशात इतिहास लिहीला गेला त्यामुळे जबाबदारीचे मोठे ओझे सर्व नगरसेवकांवर आहे, ज्याप्रमाणे बिनविरोधचा इतिहास लिहीला गेला तसाच येत्या 5 वर्षात विकास करून इतिहास घडविण्याची जबाबदारी सर्व नगरसेवकांवर असल्याचे सांगितले.















