Homeताज्या बातम्याशिंदखेडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांना “जीवन गौरव” पुरस्कार...

शिंदखेडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांना “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान

शिंदखेडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांना “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान                                                                             ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत                                     शिंदखेडा येथील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांना श्री शिवाजी विद्या प्रशासक संस्थेच्या डॉ. पी. आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (एसीटी) च्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांच्या रसायनशास्त्र या विषयातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. रमेश एस. यमगार, मुंबई विद्यापीठ, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत (व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान शाखा, कबचौ उमवि, जळगाव) रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. गुणवंत सोनवणे, प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे अध्यक्ष, मा. आमदार बाबासाहेब कुणाल जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.                                                         प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून ८१ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा पेटंट्स मिळवले आहेत. त्यांनी २२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वाचन तसेच अनेक परिषदांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांची निराली प्रकाशन, पुणे यांनी रसायनशास्त्र या विषयाची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पी.एच.डी ही. पदवी प्राप्त केलेली आहे.                   अमेरिकेतील “फाउंडेशन फॉर एक्सलन्स” या संस्थेचे ते महाराष्ट्र राज्याचे फॅसिलिटेटर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी १९९९ या वर्षापासून आजपर्यंत समाजातील विविध घटकातील ५०० पेक्षा जास्त गरीब व हुशार विद्यार्थ्यांना दोन कोटी पेक्षा जास्त रकमेची शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत अमेरिकेच्या या संस्थेने त्यांना वर्ष २०२४ चा “बेस्ट फॅसिलिटेटर” हा पुरस्कार दिलेला आहे. आतापर्यंत त्यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा “आदर्श शिक्षक पुरस्कार”, शा. मा. चव्हाण धुळे प्रतिष्ठान, धुळे चा “आदर्श प्राचार्य” पुरस्कार पाणी फाउंडेशन तर्फे “जलरत्न पुरस्कार”, “गुरु गौरव पुरस्कार” असे विविध ११ प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत.                   त्यांना “जीवन गौरव” पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील, मा. प्रफुल्ल कुमार सिसोदे, डॉ. एस. टी. पाटील, मा. अशोक बापू पाटील, भाऊसो. सुरेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, जयहिंद संस्थेचे चेअरमन विजय पितांबर पाटील, मा. चेअरमन डॉ. अरुणराव साळुंखे, व्हा. चेअरमन चंद्रशेखर पाटील, सेक्रेटरी प्रा. शरद बच्छाव, मोहन मोरे व सर्व संचालक मंडळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!