Homeसामाजिकअहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना भाजपा शिंदखेडा तर्फे सामूहिक श्रद्धांजली

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना भाजपा शिंदखेडा तर्फे सामूहिक श्रद्धांजली

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना भाजपा शिंदखेडा तर्फे सामूहिक श्रद्धांजली

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी:. अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. हे विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले.या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दु:खाचं आकाश कोसळलं आहे.
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होऊन त्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांसह मृत लोकांना शिंदखेडा येथील शहर भाजपा तर्फे कार्यालयाच्या आवारात रविवारी (दि.१५) सायंकाळी सात वाजता शहरातील नागरिकांतर्फे मेणबत्ती पेटवून पुष्पार्पण करून मौन साधत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देशातील सर्वात मोठी विमान दुर्घटना होऊन सर्वाधिक प्रवासी ठार झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या अपघातात प्रवाशां व्यतिरिक्तही नागरिक मृत्युमुखी पडले. मृत्यू पावलेल्यां प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास उपस्थित सर्वांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
प्रसंगी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, युवराज माळी, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक चेतन परमार, ॲड विनोद पाटील, वियुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले, जितेंद्र राजपूत, जिल्हा सरचिटणीस प्रविण माळी, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, जिल्हा संघ चालक हितेंद्र जैन,सेवानिवृत्त तहसीलदार वाय पी खैरनार, डॉ रविंद्र देसले,नारायण माळी,साईनाथ माळी,प्रकाश चौधरी, गोपाल चौधरी,मिलिंद पाटोळे,सचिन माळी,गुलाब सोनवणे,राहुल महिरे,अबू कुरेशी उपस्थित होते.

या दुख:द घटनेने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. ईश्वर मृतात्म्यांना शांती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे करून कुटुंबियांना यां दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना – शहराध्यक्ष संजयकुमार महाजन ( सर )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या ‘कढरे’च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!   👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल...

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या 'कढरे'च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!          👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल परिस्थितीवर मात; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ✍️ शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776842911.69cb4248 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776824835.68acba7a Source link

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख...

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख धंदा- सर्वसामान्यांची फसवणूक 👉 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

error: Content is protected !!