शिंदखेडा नगरपंचायत कार्यालयासमोर सुभाष माळीचे अन्नत्याग आमरण उपोषण मागे .
👉लेखी अहवाल व अटी, शर्तीवर पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे व नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हातुन लिंबू सरबत देऊन सुभाष माळी व रुजूबाई माळी यांनी घेतले उपोषण मागे

. ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत 👉 एक मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाल्यावर सकाळी नऊ वाजेपासून
शिंदखेडा नगरपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणास सामाजिक कार्यकर्ते तथा पं.स. माजी सदस्य सुभाष माळी व नगरसेविका रजुबाई सुभाष माळी यांनी सुरुवात केली होती. दिवसभरात अनेकानेक शहरवासियानी पाठिंबा दर्शविला होता. अखेर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लेखी पत्र देवुन उपोषणकर्ते सुभाष माळी व रजुबाई माळी यांना पाणीपुरवठा अभियंता विकास साळुंखे व नगराध्यक्ष कलावती माडी यांनी लिंबू शरबत देऊन उपोषण मागे घेतले दिलेल्या लेखी पत्रातून सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शिंदखेडा नगरपंचायत साठी पाणीपुरवठा योजना फेज वन च्या कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त होती. तदनंतर विहित निविदा प्रक्रिया राबवून तेजस कन्सट्रक्शन इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड. पुणे याना सदर्भ २ अन्वये योजना काम करने करीता कार्यादेश देण्यात आला होता. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शिंदखेडा नगरपंचायत साठी पाणीपुरवठा फेज १ या योजनेच्या कामाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती, सदर योजनेमध्ये खालील उपारी मंजूर होती. १) inspection well २) ५०० mm dia. D.I. Connecting Main 3) Jackwell. Y) Raw Water Pumping Machinery 4) ३५० mm dia. DJ. K- Raw Water Rising mans) RCC ESR Lace) ACE ESR 4.00 Lac liter) Distribution System ) Chaintre Fencing to pure Water Pumping Machinery 14) Pure Water Rising main D.J. -९ व इतर सदर सर्व मंजुर उपांगाची कामे मक्तेदारामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच दि. १४/०८/२०२५ रोजी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार शहरात काही ठिकाणी आवश्यकतेनुसार लुप लाईनस्लूईस कास्य टाकण्याचे काम करण्यात आलेले आहे. परंतु सदर फेज योजनेमध्ये नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनवर कनेक्शन जोडण्यांची तरतुद नसल्याने शहरास दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रात्यक्षिक करणे अद्याप शक्य झालेले नाही.
तथापि वेळोवेळी १४ वा वित्त आयोग व इतर उपलब्ध निधीतुन नव्या वितरण वाहिन्यांवर नळ जोडण्या करण्यात आल्या असुन उर्वरीत २००० नळ जोडण्यांची तरतुद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शिंदखेडा नगरपंचायत साठी पाणीपुरवठा योजना फेज -२ करण्यात आलेले असुन दि. ०१/१०/२०२५ रोजी सदर योजनेचा कार्यादेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार मक्तेदाराकडून लवकरात लवकर नळ जोडण्या पूर्ण करण्यात येऊन त्यानंतर शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.तसेच प्रात्यक्षिक (Trial & Fun) केल्यानंतर फेज १ योजनेच्या कामाबाबत आपले काही आक्षेप असल्यास आक्षेपांचे निराकरण करणेकामी योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांचे अधिकारी तसेच संबंधित योजनेचे ठेकेदार तेजस कन्सट्रक्शन इन्का प्राशनेट लिमिटेड, पुणे यांच्यासमवेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सदर शंकांचे निरसन करण्यात येईल, तरी आपण आपले अन्नत्याग आमरण उपोषण मागे घ्यावे.असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण कर्त्यांनी म्हटलं आहे कि,
आपण केलेल्या आवाहनानुसार येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संबंधित ठेकेदार आणि नगरपंचायतीचे अधिकारी यांच्या समवेत मिटींग घेऊन शंकांचे निरसन केले जावे. तद्नंतर या योजनेतील त्रुटींचे समाधान झाले नाही तर आम्ही १५ दिवसांनंतर मी माझ्या लोकशाही मार्गाने आंदोलन करेन.वरील अटींना लक्षात घेऊन मी माझे अन्नत्याग आंदोलन तुर्त स्थगित करीत आहे.





















