शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख धंदा- सर्वसामान्यांची फसवणूक
👉 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला केली तक्रार -कारवाईची मागणी
👉 अन्यथा एक मे पासुन ग्रामपंचायत विरदेल येथे आमरण उपोषण करणार
✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत) :-
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख धंदा भोळया अंध भक्तांना व सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे.बनावट दारुमुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. हयासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार दिली असुन कारवाईची मागणी केली आहे.अन्यथा एक मे ला ग्रामपंचायत विरदेल येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी हयावेळी सांगितले.
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे ग्रामपंचायत जवळ सेंट्रल बँकेची शाखा आहे, सदर बँकेजवळ सुरू असलेला देशी विदेशी बनावट दारू विक्रीचा व्यवसाय व तिथेच गावठी हातभट्टीची दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. विरदेल चौफुली वर एक पानटपरी आहे या पान टपरीवर गांजा विक्री सुरू आहे भोंदू बाबा देवमन मोरे गांजा विक्री करतो तसेच त्यांच्या राहत्या घरात गांजा लपवलेला असतो या भोंदू बाबांवर आमंली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी गांजा विक्री बंद करावा आदिवासी वस्ती अनुक्रमे एक व दोन खुलेआम जाहीर गावठी दारू विक्री होते दारूच्या भट्टया दारातच सुरू असतात प्रशासनाचा धाक राहिला नाही कायमस्वरूपी गावठी दारूचा व्यवसाय बंद करून बंदोबस्त व्हावा तसेच ग्रामपंचायत परिसरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे,समाज मंदिर आहे या ठिकाणी एक मंदिराचे अनधिकृत बांधकाम झालेले आहे सदर बांधकामाची परवानगी घेतलेली आहे का? सदर बांधकाम १) भोंदू बाबा राजन शिरसाठ भीमनगर धुळे,२)भोंदू बाबाचे सहकारी शांतीकमल बैसाणे इंदिरानगर धुळे ३) मुकेश अर्जुन बैसाने विरदेल, ४)राहुल युवराज बैसाणे व इतर यांनी संघटितपणे एकत्र येऊन मंदिराचे बांधकाम केलेले आहे.सदर दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेस रात्री बारा वाजेनंतर पूजा, हवन, तंत्र मंत्र, जादूटोणा, भूत,प्रेत व शिकरण असे आघोरी प्रयोग केले जातात अंधश्रद्धेमुळे भितीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे तक्रार करायला लागली समोर येत नाही.स्वतःला फुले शाहू आंबेडकर यांचे अनुयायी आहोत.बौद्धिक उपासक उपासिका आहोत असे सांगून नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करीत आहेत.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात असा घाणेरडा प्रकार सुरू आहे शर्मेने खाली मान घालावी लागते जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत सदर तक्रार अर्जदाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. योग्य कारवाई न झाल्यास एक मे पासून ग्रामपंचायत विरदेल कार्यालय जवळ आमरण उपोषण करण्यात येईल यासंदर्भात काही प्रश्न निर्माण झाले तर याची जबाबदारी प्रशासनाची राहील माझ्या जिविताला धोका आहे मी उपोषण सुरू करणार आहे असे लक्षात आले असता मला शिव्या शाप द्यायला सुरुवात झाली आहे पोलीस प्रशासनाने अर्ज दिल्यानंतर तात्काळ मला पोलीस संरक्षण मिळावे असे तक्रार अर्जात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी नमूद केले आहे सदर प्रकरणाची शिंदखेडा पोलीस स्टेशन ने योग्य ती दखल घेऊन त्वरित कारवाई करून भोळ्या अंध भक्तांची व सर्वसामान्यांची लूट फसवणूक आणि भयमुक्त करावे तसेच बनावट दारुमुळे कुटुंब उध्वस्तापासुन मुक्त करावे अशी मागणी श्री. बैसाने सह इतरांनी केली आहे.


















