👉शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील गणेश हायस्कूल शेवाळे येथे सालाबादाप्रमाणे 2015 पासून ते आज पर्यंत नियमित स्काऊट गाईडची शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीही दि 29 डिसेंबर पासून ते एक जानेवारीपर्यंत चार दिवसाचे स्काऊट व गाईड दोघांचेही हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि मात्रा मृदया निसर्गप्रेम प्रामाणिकपणा अशी संघ भावना नेतृत्व गुण निर्णय क्षमता असे विविध प्रकारचे संस्कार या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर घडत असतात चार दिवस विद्यार्थी स्वतः ची सर्व काम स्वतःच करत असतो स्वयंपाकापासून तंबू सजावट साफसफाई टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे इत्यादी सर्व काम विद्यार्थी करत असतात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चार दिवस निवासाला मुक्कामी राहत असतात.स्काऊट विभागाचे विभाग प्रमुख एस पी पाटील सर सुवर्णसिंग गिरासे सर मराठे मॅडम पंकज बोरसे सर लक्ष्मण जगताप सर कलाशिक्षक सुनील मोरे व मुख्याध्यापक ए.जे. नेरकर सर पर्यवेक्षक सतीश एम देशमुख सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा शिबिर पार पडले 59 गाईड 81 स्काऊट ऐकून 140 स्काऊट गाईड 59 गाईड 81 स्काऊट ऐकून 140 स्काऊट गाईड सहभागी झाले होते. सदर शिबीर वाडी शेवाडी प्रकल्पाच्या शेजारी चिमठाणे साक्री रस्ता लागून आयोजित करण्यात आले.















