Homeउद्योगआधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध....       ...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध….             तरुणांनी नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा पालकमंत्री जयकुमार रावल दोंडाईचा येथे महारोजगार मेळावा संपन्न ✍️ शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध….             तरुणांनी नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा पालकमंत्री जयकुमार रावल
दोंडाईचा येथे महारोजगार मेळावा संपन्न
✍️ शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात औद्योगिक, कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि डिजिटल क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रात भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याने तरुणांनी या नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहेत.तर कुठलेही यश आपल्यापासून दूर राहू शकणार नाही. आपण आपले जे ध्येय आहे, आपला जो संकल्प आहे, त्या संकल्पपूर्तीसाठी आपण पुढे गेले पाहिजे त्यातून विद्यार्थ्यांना यश निश्चितच मिळेल. या रोजगाराच्या विविध संधीचा विद्यार्थ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात 100 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. धुळे शहरांमध्ये दोन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केलेले आहे. तर दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 25 विविध क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला असून, या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 1 हजार पेक्षा जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.आजच्या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे, आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये आपण कुठलीही शैक्षणिक पात्रता धारण करत असलात दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बीएससी अॅग्री या सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आज इथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही लाभ आपण या रोजगार मेळाव्यामध्ये देणार आहोत. आता या योजनेची मुदत 11 महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 3200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राचार्य के. डी गिरासे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. मेळाव्याचे सूत्रसंचालन डी.एम. गिरासे यांनी तर व्ही. एम. गिरासे यांनी आभार मानले. या मेळाव्यास संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच विविध कंपन्याचे प्रमुख व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.                        ———————————–.                     त्यावेळी यांची प्रमुख उपस्थिती.                         धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर शरद मंडलिक, सुनील गोसावी, भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे , जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कुलकर्णी मॅडम, अप्पर तहसीलदार दोंडाईचा संभाजी पाटील, तहसीलदार शिदखेडा अनिल गवांदे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा सुरेश नेतनवार, स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सचिव सी. एन. भाऊसाहेब, सहाय्यक आयुक्त रा.नी. वाकुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा नारायण पाटील, उपसभापती प्राध्यापक आर.जी. खैरनार, भाजपा तालुका अध्यक्ष दोंडाईचा दीपक बागल, जिल्हा परिषद माजी सभापती संजीवनी ताई सिसोदे,चंद्रकला सिसोदिया, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील, माजी पं. स. उपसभापती रणजितसिग गिरासे,डॉ. दिपक बोरसे,भाजपा दोंडाईचा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, शहराध्यक्ष शिंदखेडा संजय कुमार महाजन,तालुका अध्यक्ष भाजपा मोतीलाल वाकडे,जिल्हा चिटणीस डी. एस. गिरासे, महेंद्र खैरनार,रामनाथ मालचे, प्राचार्य के.डी. गिरासे, डॉ. डी एम पटेल, डॉ. व्ही एस गिरासे,आर.टी गिरासे, डी एन जाधव आदींसह माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776498944.5668fb92 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776480818.55bfe78b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776462553.5557c76e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776444483.5436eae9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776426418.5341cf4a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776498944.5668fb92 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776480818.55bfe78b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776462553.5557c76e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776444483.5436eae9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776426418.5341cf4a Source link
error: Content is protected !!