देशसेवेचे व्रत: जिद्द, चिकाटी आणि आईचा त्याग! . 👉 “घरादाराचा त्याग करून जो सीमेवर लढतो,
तोच खरा या मातीचा मान राखतो.”.
✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (यादवराव सावंत ). आज आमच्या ( भुपेद्रसिह राजपूत ) कुटुंबासाठी सुवर्णक्षण आहे. माझ्या मोठ्या बहिणीने आपल्या दोन मुलांपैकी धाकट्या लेकाला आज खऱ्या अर्थाने ‘भारतमातेचा सुपुत्र’ म्हणून देशाच्या स्वाधीन केले आहे. बीएसएफ (BSF) मधील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो आज एक करारी सैनिक म्हणून उभा आहे.
एक आई आणि तिचा शूर अभिमान एकीकडे मुलाला स्वतःपासून दूर सीमेवर पाठवताना काळजात होणारी थोडी घालमेल आणि दुसरीकडे “माझा मुलगा देशाचे रक्षण करणार” हा उर भरून येणारा अभिमान.. या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर आज माझी बहीण उभी आहे. आपल्या काळजाचा तुकडा देशासाठी देणं, हे केवळ एक माताच करू शकते.
धाकटा लेक, मोठी जबाबदारी
लहानपणापासून शिंदखेड़ा मामाचे गावात शिक्षण पूर्ण केले ज्याला लाळाकोडात वाढवलं, तोच आज खांद्यावर बंदुकीची जबाबदारी घेऊन देशाच्या सीमा राखायला सज्ज झाला आहे. त्याचे हे यश केवळ त्याचे नाही, तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्याच्या आईच्या संस्कारांचे आहे.
कर्तव्याचा मार्ग कडाक्याची थंडी असो वा रणरणतं ऊन, आता तो सीमेवर पहारा देईल, जेणेकरून आपण सुरक्षित राहू शकू. सीमेवर तैनात असलेल्या या ‘सीमा सुरक्षा दलाच्या’ जवानाला आणि त्याला जन्म देणाऱ्या त्या माऊलीला आमचा मानाचा मुजरा!
”घरादाराचा त्याग करून जो सीमेवर लढतो,
तोच खरा या मातीचा मान राखतो.”
त्याचे मुळगाव नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापपूर असुन आई संगीता भरतसिह राणा व वडील भरतसिह नहारसिह राणा हे पिको फॉल चे काम करतात. अत्यंत कष्टाळु कुटुंब. म्हणतात ना कष्टाच्या झाडावर फळ नेहमीच चांगले लागतात.त्यातून दिपराज भरतसिह राणा हयाची देशसेवा करण्यासाठी सैनिक म्हणून उभा राहिला आहे. तो लहान पणा पासुनच मामाचे गाव शिंदखेड़ा येथे शिक्षण करत होता एम.एच.एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चा विद्यार्थी आहे. अशा जवानास सलाम.















