👉 संगीत अनिल पाटील ने संगितकार मध्ये उतुंग भरारी, शिंदखेडा शहरवासियांना सार्थ अभिमान. . 👉 शिंदखेडा येथे अशोक सिनेप्लेक्स मध्ये वन टु चा चा चा चित्रपट संगीत, दिग्दर्शन करून प्रवेश करणारा संगीत पाटील यांचे जोरदार शहरातुन कौतुक 👉 सदर कार्यक्रमाचे सुलवाडेचे माजी सरपंच भावडू पाटील यांनी केले आयोजन. 👉 वन टु चा चा चा चित्रपट आज शुक्रवारी तिन्ही शो मोफत –भावडू पाटील .

✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
शिंदखेडा मतदार संघांचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत शुक्रवारी प्रदर्शित होणारा वन टू चा चा चा या चित्रपटात शिंदखेडा शहराचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार गीतकार आणि गायक ही तिहेरी भूमिका संगीत अनिल पाटील यांनी फुल कॉमेडी फिल्म वन टू चा चा चा ला संगीत दिग्दर्शन करून दोन गीताच्या प्रवेशाने बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली शिंदखेडा शहरातील सुप्रसिद्ध अशोक सिनेप्लेक्स मध्ये 16 जानेवारी शुक्रवार रोजी प्रादेशिक होत आहे त्यानिमित्ताने शिंदखेडा शहरातीलच जगभरात नावलौकिक करणारा संगीत पाटील यांचे जोरदार स्वागत समारंभ सुलवाडे येथील प्रल्हाद लोटन पाटील उर्फ भावडू पाटील यांनी आयोजन करेल करून शिंदखेडा शहरातील सर्व स्तरावरील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यात माजी नगराध्यक्ष गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष दिला पाटील माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले सुप्रसिद्ध डॉक्टर रवींद्र देसले विद्यमान उपनगराध्यक्ष उदय देसले गटनेते चेतन परमार नगरसेवक सुयोग भदाणे,दादा मराठे,संदीप गिरासे, गुलाब सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, ज्ञानेश्वर सकट,अबू कुरेशी अरुण देसले,उल्हास देशमुख,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एस. पवार, उपप्राचार्य एस. टी. राऊळ,गणेश मराठे, प्रा. परेश शहा,आर.एच. भामरे, दगा चौधरी, सुभाष पवार, घनश्याम पवार,दिपचंद पाटील,रमेश भामरे,संजय बडगुजर, सत्ताळीस आबा,महेद्र निकम,चंद्रकांत गोधवाणी, अशोक सिनेप्लेक्स चे रोहित कौठळकर आदिसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. परेश शहा यांनी शिंदखेडा शहरातील संगीत अनिल पाटील हे ग्रामीण भागातून जगभरात संगीत, गितकार,गायक अशी तिहेरी भुमिका निभावत आपल्या शिंदखेडा शहराचे नाव रोशन केले ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई,ओमान, बांगलादेश, मलेशिया, थायलंड,केनिया सह भारतात जयपुर,उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, जैसलमेर,जोधपुर, अमृतसर, चंदिगड, दिल्ली, आग्रा, डेहरादून,कोची, मथुरा,विशाखापट्टणम, कलकत्ता,चेन्नई, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये त्यांचे शो झालेले आहेत लंडन पंडित व जॅकपॉट इंग्रजी चित्रपटात काम केले आहे लंडन टुडे या वृत्तपत्राने याची एक ग्रामीण भागातील तरुण संगीतकार म्हणून मोठ्या प्रमाणावर दाखल घेतली आहे. त्यांचे गाजलेले अल्बम तू मिला, उड जा उड जा रे हया तर टीव्ही सिरीयल पिंजरा खूप सुरतीका मध्ये टायटल सॉंग त्यांनी दिले आहेत संगीतकार म्हणून मोहब्बत आणि आता वन टू चा चा या चित्रपटात आपले तिहेरी भूमिका निभावली आहे.यावेळी प्रा. सुरेश देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार अनिल पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन दीपचंद पाटील यांनी केले. त्यानंतर अशोक सिनेप्लेक्स मध्ये पहिला शो शिंदखेडा शहरातील मान्यवरांनी पाहत आस्वाद घेत आपला आनंद व्यक्त केला.शुक्रवारी झालेल्या वन टू चा चा चा हा चित्रपट प्रदर्शित होत असताना या दिवसाचे तीनही शो सुलवाडे येथील माजी सरपंच भावडू पाटील यांनी शिंदखेडा शहर व परिसरातील चाहत्यांसाठी मोफत ठेवला आहे.















