एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन
✍️
– विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये व आर्थिक साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने शहरातील एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षपूजनाने करण्यात आली. यावेळी शिंदखेडा केंद्रप्रमुख श्री. कैलासजी शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल मराठे तसेच पालक प्रतिनिधी श्री. प्रवीण कुलकर्णी, श्री. रामसिंग गिरासे, श्रीमती अश्विनी खैरनार व श्रीमती जागृती जाधव उपस्थित होते.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. यामध्ये भेळ, पाणीपुरी, वडापाव, खमंग, मिसळ, पॉपकॉर्न, सँडविच, पोहे व गुलाबजाम यांसारख्या चविष्ट पदार्थांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी केवळ पदार्थ तयार केले नाहीत, तर त्यांची विक्री करताना नफा-तोटा, किंमत ठरवणे व आर्थिक नियोजन यांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. स्मिता देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती. उपासना शुक्ला व श्रीमती. भाग्यश्री नाईक यांनी केले.















