शिंदखेडा शहराचा चेहरा मोहरा बदलणार – नगराध्यक्षा कलाताई माळी विकासकामाचा धडाका, शहर स्वच्छतेवर विशेष भर शौचालय ठिकाणी बोअरिंग उभारणी. ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा नगरपंचायत च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी कलाबाई सुकलाल माळी यांनी बाजी मारली असून परमार स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अस्वच्छता व मूताऱ्याची देखरेख केल्यानंतर तेथील गंभीर अवस्था पाहून प्रशासन व ठेकेदार यांना समज देऊन पाच दिवसात सर्व परिसर स्वच्छ व मुतारीही स्वच्छ झाली पाहिजे असे आदेश केले त्यानंतर दुसरा मोर्चा वरपाडे रोडवरील जिल्हा परिषद च्या मागील प्रभाग क्रमांक एक दोन तीन या स्थानिक नागरिकांसह महिलासाठी सुलभ शौचालय बांधण्यात आलेले आहे परंतु पाण्याअभावी तेथील शौचालय बंद अवस्थेत असून वापरण्यास सुयोग्य नसल्याने तेथे पाण्यासाठी बोअरवेल करू असे आश्वासन दिल्यानंतर लागलीच नगराध्यक्ष कलाताई माळी यांनी गटनेते राकेश माळी व नगरसेवकाच्या आणि नगरपंचायत प्रशासनाच्या उपस्थितीत बोअरिंग चे काम सुरू केले आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष कलाताई माळी व नगरसेवकांनी शहरातील प्रथम स्वच्छतेकडे विशेष मोहीम हाती घेतली आहे सपुर्ण शहर स्वच्छतामुक्त करण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला असून सर्वांना सोबत घेऊन कोणतेही मतभेद न ठेवता विकास कामे करू असे मत त्यांनी व्यक्त केले या त्यानंतर यापूर्वी भगवा चौक ते शिवाजी चौफुली पर्यंत स्वच्छता यंत्र द्वारे रस्ता धुळमुक्त देखील केला तसेच या यंत्रामार्फत शहरातील मुख्य रस्त्यावरील हे यंत्र फिरवून सर्व रस्ते धुळ मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 08/01/2026 रोजी
प्रभाग क्रमांक 1,2,3 च्या नागरिकांसाठी शौचालयाला पाणी नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना नवीन बोअरवेल करून दिले
यावेळी उपस्थित गटनेते राकेश दादा माळी, सुभाष माळी,अरुण देसले, नगर सेवक राहुल पाटोळे, अर्जुन भिल,राहुल पाटील, दिपक अहिरे,गजु भामरे,गणेश भिल,निलेश पाटील जिभाऊ फुले,राजेश मालचे,रऊप बागवान नगरपंचायत चे अधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















