Homeताज्या बातम्याशिंदखेडा नगरपंचायत येथे नगरसेवकाच्या आरक्षण सोडत जाहीर-           ...

शिंदखेडा नगरपंचायत येथे नगरसेवकाच्या आरक्षण सोडत जाहीर-                                      👉 17नगरसेवक सदस्य पैकी 9 महिला व 8 पुरुष तर नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला           

शिंदखेडा नगरपंचायत येथे नगरसेवकाच्या आरक्षण सोडत जाहीर-                                      👉 17नगरसेवक सदस्य पैकी 9 महिला व 8 पुरुष तर नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला           ✍️शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत)  :-  शिंदखेडा येथील नगरपंचायत सभागृहात आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पिठासन अधिकारी धुळे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना विभाग बालाजी क्षिरसागर व नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. विपुल साळुंखे, सचिन वाघ, गणेश पवार, दिनेश फुलपगारे, विवेक डांगरीकर, यांनी सहकार्य केले. नगरपंचायत च्या एकूण 17 प्रभागासाठी नगरसेवक पदाच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण तसेच महिला राखीव यांच्या आरक्षण सोडत लहान मुलगी स्वरा सोनवणे व यश बोरसे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आली. यावेळी शिंदखेडा शहरातील सर्वच पक्षातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधीच सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी शिंदखेडा नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला निघाल्याने एकंदरीत नगरपंचायत निवडणूक चुरशीची व रंगतदार होतील अशी चिन्ह दिसू लागले आहेत. नगरपंचायत नगरसेवक आरक्षण प्रभाग निहाय खालील प्रमाणे प्रभाग क्र एक अनुसुचित जाती , प्रभाग क्र दोन अनुसुचित जमाती महिला, प्रभाग क्र.तीन अनुसुचित जाती महिला,प्रभाग क्र. चार ना. मा. प्र महिला , प्रभाग क्र पाच ना. मा. प्र महिला., प्रभाग क्र. सहा ना. मा. प्र महिला , प्रभाग क्र. सात सर्वसाधारण, प्रभाग क्र. आठ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. नऊ सर्वसाधारण, प्रभाग क्र. दहा सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11ना. मा. प्र.पुरुष , प्रभाग क्र. 12 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 13 सर्वसाधारण महिला , प्रभाग क्र. 14 अनुसुचित जमाती महिला,प्रभाग क्र. 15 ना. मा. प्र. , प्रभाग क्र. 16 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 17 अनुसुचित जमाती पुरुष असे प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे. अनुसुचित जाती दोन जागेपैकी एक महिला व एक पुरुष तर अनुसुचित जमाती तीन पैकी एक पुरुष तर दोन महिला, तसे नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच पैकी तीन महिला तर दोन पुरुष, सर्वसाधारण जागेसाठी सात पैकी तीन महिला तर चार पुरुष असे एकुण 17 पैकी 9 महिला,8 पुरुष. एकंदरीत लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या आरक्षणानंतर खरे चित्र स्पष्ट झाल्याने आता सर्वच पक्ष आपापल्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी व चाचचणी करून निर्णय घेतील. खऱ्या अर्थाने आता नगरपंचायत निवडणुकाला रंग भरणार आहे. हळुहळु शिंदखेडा शहरात राजकीय वातावरण तापु लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!