पिंप्राड येथे संजीवनी सिसोदे यांनी राबविले ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार ‘आरोग्य शिबिर..

.✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत नरडाणा: पिंप्राड येथे मंगळवार दि 30 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान 2025 अंतर्गत पिंप्राड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ आरोग्य शिबिराचे आयोजन मंत्री जयकुमार भाऊ रावल. यांच्या सूचनेवरून मा. सभापती जि प धुळे सौ.संजीवनी सिसोदे सह डॉ कच्ची व डॉ रजपूत नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी सेवा हॉस्पिटल धुळे, पिंप्राड ग्रामपंचायत, जि प शाळा पिंप्राड व उमेद बचत गट याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले. शिबिरात 72 दंत रुग्णांची, 68 डोळ्यांची, 59 ईसीजी, 62 रक्त तपासणी , शुगर-बी पी 198 रुग्णांची तपासणी करण्यात आली. अंदाजे 350 ते 400 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. गरजूंना चष्मे, गोळ्या औषधे याचे वाटप झाले. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिनजी बोडके यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन भाजप शिंदखेडा मंडळ अध्यक्ष श्री मोतीलाल वाकडे यांच्या हस्ते व गट विकास अधिकारी शिंदखेडा श्री नेतनवार, मा. सभापती पं स शिंदखेडा श्री राजेश बोरसे, पिंप्राड सरपंच श्री अभिमन्यू भील, उपसरपंच श्री दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डॉ राजेश अग्रवाल चेअरमन सेवा हॉस्पिटल धुळे व डॉ स्वप्नील शहा यांनी शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना सह आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. डॉ.सौ.युगंधारा सिद्धार्थ सिसोदे, दंतशल्य चिकित्सक उपजिल्हा रुग्णालय, यांनी मौखिक आरोग्य व दातांची काळजी या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. डॉ कोळी नेत्ररोगतज्ञ यानी डोळ्यांची काळजी यावर मार्गदर्शन केले व डोळ्यांची तपासणी करून गरजू लोकांना मोफत चष्म्याचे वाटप केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरीफ कच्ची व डॉ. राजपूत वैद्यकीय अधिकारी प्रा.आरोग्य केंद्र नरडाणाचे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, मुख्याध्यापिका आशा खैरनार जि.प.शाळा पिंप्राड सह सर्व शिक्षक व विद्यार्थी व श्री राजेन्द्र पाटील, उमेद अभियान प्रमुख, बचतत गट प्रवर्तक, सी आर पी, बँक सखी, कृषी सखी नरडाणा यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचे प्रास्ताविक डॉ कच्ची यांनी केले. संजीवनी ताईनी नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वांच्या मदतीने बहुउपयोगी शिबिराचे आयोजन अतिशय चांगले केले. सर्व सहभागी डॉक्टरांनी अतिशय सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवा दिल्याबद्दल आभार मानले. शेवटी डॉक्टर राजपूत यांनी सर्वांचे विशेषतः ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावाचे आभार मानले.















