शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुचिरा पवार यांचा शेतकरी संघर्ष समिती शिंदखेडा तर्फे सत्कार
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
तालुक्यात नुकतीच तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. रुचिरा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल शेतकरी संघर्ष समिती शिंदखेडा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष विजय चौधरी, सदस्य गजेंद्र भामरे, अशोक परदेशी, प्रकाश पाटील, दत्तात्रय देसले, रवींद्र शिरसाठ व संतोष ठाकूर उपस्थित होते. तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त डॉ. रुचिरा पवार यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती सदस्य दत्तात्रय देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष विजय चौधरी यांनी मानले.















