शिंदखेड्याच्या गांधी चौकात थांबले होते ‘गांधीजी’ आठवणीचा जागर
✍️
शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचे आणि कार्याचे महत्त्व जगभर आहे. शिंदखेडा शहरानेही ‘गांधी चौक’ ही स्मृती जपून ठेवली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी शिंदखेड्यात आले असताना याच चौकात त्यांची सभा झाली होती, तेव्हापासून या चौकाला ‘गांधी चौक’ हे नाव पडले.
शिंदखेडा भेटीदरम्यान, गांधीजी येथील रथगल्लीतील पोपटभाई बाबूभाई शाह यांच्या लाकडी इमारतीच्या माडीवर वास्तव्याला थांबले होते, अशी आठवण जुने लोक सांगतात.
आजही शिंदखेडात गांधीजींचा पुतळा नसला तरी, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये “एक रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा” अशाच घोषणा ऐकू येतात.अजून ही दरवर्षी नगरपंचायत कडून ध्वजारोहणाचा मान माजी सैनिकांना दिला जातो. हयापुर्वी हा मान माजी स्वातंत्र्य सैनिक वा ज्येष्ठ नागरिकांना दिला जात होता.त्यांचे विचार लोकांच्या हृदयातील त्यांचे स्थान अढळ ठेवून आहेत. त्यामुळे गांधीजींची विचारधारा आजही मनात कायम आहे.
महात्मा गांधी जंयतीनिमित्त आजही शिंदेखेड्यातील लोक गांधीजींच्या आठवणी जागवतात. शिंदखेडा तालुक्यात लोकांच्या आचरणात आणि विचारात गांधीजींचे तत्त्वज्ञान खोलवर रुजलेले आहे. 















