शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे सेवा पंधरवाडा तर्गत डीबीटी मार्फत तात्रीक दुरुस्त्या व विविध दाखल्यांचे वाटप.
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दि.01/10/2025 रोजी मंडळ भाग शिंदखेडा मधील पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत मा उपविभागीय अधिकारी श्री शरदजी मंडलिक व तहसीलदार श्री संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे इंदिरा गांधी वृद्धपकाळ व अपंग निराधार लाभार्थी तसेच श्रावण बाळ वृद्ध महिला पुरुष विधवा अपंग यांचे डीबीटी मार्फत तांत्रिक अडचणी दुरुस्त्या करून त्यांना लाभ देणे कामी या शिबिरांतर्गत नियोजन करण्यात आले. तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा वाटप करणे उत्पन्नाचे दाखले वाटप करणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास मंडळ अधिकारी श्री ए सी गुजर,ग्रा. म. अधिकारी पाटण श्री. आर.एस. सैय्यद , तहसील कार्यालय शिंदखेडा येथील अधिकारी श्री सुनील मधुकर कणके. एम एस भावसार, मदतनीस शुभम गिरासे व मुजफ्फर पठाण इतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच गावातील माजी सरपंच श्री विशाल पवार सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पी एल पवार, व इतर गावातील वरिष्ठ ग्रामस्थ हजर होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ भाग शिंदखेडा मधील श्री ए सी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी आर.एस. सय्यद व ग्रामस्थांनी केले कार्यक्रमात मंडळ अधिकारी व भागातील शेतकरी खातेदार ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.















