शिंदखेडा येथील धडाडीचे युवा मा. नगरसेवक दिपक चौधरी यांची जिल्हा सदस्य पदी नियुक्ती-
भाजपा कार्यकारिणीत नवे नेतृत्व. ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
भाजपाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.ना. जयकुमारजी रावलसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि मा.जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने यांच्या आदेशाने शिंदखेडा येथील लोकप्रिय नगरसेवक मा.दिपकभाऊ चौधरी यांची भाजपा धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मा.ना.जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते दिपकभाऊ चौधरी यांनी स्विकारले. या प्रसंगी भाजपाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस मा.डी.एस.गिरासे सर , गटनेते मा.अनिल रावसाहेब वानखेडे, उपनगराध्यक्ष मा.प्रकाशआप्पा देसले, मा.प्रविण पिंटूभाऊ माळी, मा.चेतनभाऊ परमार,ॲड.विनोदभाऊ पाटील, सुयोगदादा भदाने, मनोजभाऊ भामरे यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपा संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दिपकभाऊंच्या नियुक्तीचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. पक्षवाढीसाठी दिपकभाऊ चौधरी यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















