शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे सेवा पंधरवाडा व शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत.
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे मंडळ भाग अंतर्गत चिमठाणे येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा मार्फत विठ्ठल मंदिर सभागृह येथे महाशय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब श्री शरदजी मंडलिक साहेब व मा. तहसीलदार श्री संभाजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पधरंवाडा व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत जिवंत सातबारे टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत सातबारे वाटप, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, agristrag प्रमाणपत्र व डी बी टी पोर्टल वर नोंदणी व आधार प्रामाणिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्ष स्थान सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे ,कपिल गिरासे, भूषण गिरासे, मंडळ भागातील सर्व सरपंच, पोलीस पाटील,ग्रामस्थ, शेतकरी बांधव,जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला
DBT प्रणाली साठी मंडळ अधिकारी श्री मुकेश भावसार व मंडळ अधिकारी सुनील कनके व त्यांची पूर्ण Team उपस्थित होती
सदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी मीना पवार ,ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा सदर, श्री सुदर्शन रोकडे, श्रीमती गौरी पाटील , श्रीमती प्रतीक्षा लोहार व मंडळ भागातील सर्व महसूल सेवक यांनी केले
सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी श्री सुदर्शन रोकडे यांनी केले, प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी प्रतीक कुलकर्णी यांनी केले















