शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव – वसमाने येथे अवकाळी वारा वादळ व पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळी व पपई पिकाचे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना तात्काळ सहानुग्रह अनुदान द्या
👉शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे.
✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
अवकाळी वारा वादळ व पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील लोहगाव-वसमाने येथे मोठ्या प्रमाणात केळी व पपई पिकाचे नुकसान झाले असल्याने आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना कळताच त्यांची जन्मदात्री आई वारल्याचे दुःख बाजुला सारुन व आईने सांगितलेले शब्द शेतकरी व गोरगरीबांची सतत मदतीला धाऊन जाणे लक्षात घेऊन शानाभाऊ सोनवणे स्वतः लोहगाव -वसमाणे येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाच्या व महसुल विभागाचे अधीकारीना बोलाऊन पंचनामे केले व त्यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी मा.अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधुन अप्पर तहसीलदारांना सांगितले की आपण ज्या प्रमाणे लोहगाव – वसमाने येथे महसुलचे व कृषी विभागाचे कर्मचारींना पाठऊन पंचनामे केले त्याच प्रमाणे संपुर्ण शिंदखेडा तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या शेतातील पपई, केळी, ऊस , कापुस,मका सह शेतातील पिकांची पुर्णपणे नुकसान झाले असल्यामुळे आपण आपले महसुल मंडळाचे व कृषी विभागाचे कर्मचारींना तात्काळ आदेश प्रारीत करून शेतकऱ्यांचे शेतात जाऊन पंचनामे करून सहानुग्र अनुदान या दोन ते तीन दिवसात ध्यावे असे दुरध्वनी वर संपर्क करुन सांगितले त्यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, लोहगाव – वसमाणे चे माजी सरपंच महेंद्र पाटील,धमाणे येथील दादाभाऊ पाटील, लोहगाव -वसमाणे येथील शेतकरी जगदीश पाटील, सतीश माळी, जगन्नाथ माळी, सुनील पाटील,मुरलीधर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, ईश्वर माळी सह परीसरातील शेतकरी व गावकरी उपस्थित होते















