मैदानी स्पर्धेत एम.एच.एस.एस.महाविद्यालयाचे यश…
पाच विद्यार्थी व चार विद्यार्थिनी यांची जिल्हास्तरीय निवड
✍️
शिंदखेडा शहरातील एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 14 व 19 वर्षे आतील मुले-मुलींच्या मैदानी स्पर्धेत पाच विद्यार्थी व चार विद्यार्थिनी यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली असून, सदर स्पर्धा ही दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल या ठिकाणी घेण्यात आलेत, एक दिवस मुलांची व दुसऱ्या दिवशी मुलींची स्पर्धा घेण्यात आले असून शनिवारी झालेल्या मुलांचे स्पर्धेत अमित बापू बेडसे 600 मीटर धावणे प्रथम, सावन सुनील लोंढे गोळा फेक प्रथम, अमित बेडसे 400मी. धावणे प्रथम , सुरेश मनिर पटले भालाफेक द्वितीय, साई रवींद्र गिरासे 5 की.मी. धावणे द्वितीय , हितेश सतीश कोळी 5 कि.मी. धावणे तृतीय, हर्षल लक्ष्मण भदाणे 1500 मी. धावणे तृतीय क्रमांक मिळवलेत,
मुलींच्या गटात अश्विनी दगा माळी तिहेरी उडी प्रथम, वसुंधरा आननसिंग राजपूत 100 मी. धावणे द्वितीय, साक्षी ईश्वर सुतार 3 कि.मी. चालणे द्वितीय व 400 मीटर धावणे तृतीय, हर्षदा नरेंद्र राजपूत हातोडा फेक द्वितीय, चैताली शंकर लोहार 200मी. धावणे व लांब उडी तृतीय, आकांक्षा भोला गुप्ता 400मी. हर्डल तृतीय याप्रमाणे सदर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी यशस्वी क्रमांक मिळवून यश संपादन केलेले दिसून आलेत सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा. भैय्या मंगळे, आर बी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले, विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले, उपाध्यक्ष हसनभाई शमशी, सचिव आनंदा चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री टी.एन.पाटील, एल. एम. पाटील, तसेच शिक्षक शिक्षिका वृंद यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले.















