बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)
👉
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला
सदर शिबिराचे आयोजन शिंदखेडा शहरातील कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधूचंद्र फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरासाठी उपतालुकाप्रमुख मनोहर राजपूत यांनी पुढाकार घेतला होता तर शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत करण्यात आले
या प्रसंगी शिंदखेडा शहरप्रमुख संतोष देसले उपतालुकाप्रमुख मनोहर राजपूत माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील सागर देसले आर आर पाटील भास्कर पवार दरबारसिंग गिरासे संजय बाविस्कर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ शाम सूर्यवंशी व डॉ तौसिफ पिंजारी उपस्थित होते त्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले
सदर शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणीसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला तसेच गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली या शिबिराचा लाभ शिंदखेडा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले
शिबिराचे आयोजन सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेत्रम आय सेंटर एच डी एफ सी बँकेसमोर मेन रोड शिंदखेडा येथे करण्यात आले होते संपूर्ण शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी शिवसेना उबाठा तालुका संघटनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधूचंद्र फाउंडेशन शिंदखेडा चे संस्थापक मनोहर राजपूत व सचिव भाऊसाहासेब माळी तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या सामाजिक उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध झाली असून समाजाभिमुख कार्याची प्रभावी झलक या शिबिरातून पाहायला मिळाली.
















