शिंदखेडा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती. ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत

आरोग्य विभाग जि.प.धुळे मा. डॉ. सचिन बोडके सर जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे व मा. श्री. अनिल पाटील सर जिल्हा हिवताप अधिकारी, धुळे यांच्या आदेशानुसार तसेच मा. डॉ. रुचिरा पवार मॅडम तालुका आरोग्य अधिकारी, शिंदखेडा व मा. डॉ. बिपीन सोनवणे सर वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र,धमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक – 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त शिंदखेडा शहरात डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.हिवताप हा डासांमुळे होणारा आजार आहे. हा आजार anopheles (मादी) डास चावल्याने पसरतो. वेळेवर तपासणी व उपचार केल्यास पूर्णपणे बरा होतो.
हिवतापाची लक्षणे – थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी, मळमळ होणे, अतिसार, अशक्तपणा येणे. हिवतापापासून बचावासाठी काय करावे –घराभोंवती स्वच्छता ठेवा.पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा.दरवाजे – खिडक्यांना जाळी लावा.मच्छरदाणीचा वापर करा.डास प्रतिबंधकाचा वापर करा.साचलेले पाणी वाहते करा. डासांची पैदास कुठे होते –पाण्याच्या टाकी /ड्रमकुलर /फ्रिजच्या मागच्या ट्रेमध्ये,जुनी टायर,उघडी टाकी/ विहीर,फेकून दिलेल्या बाटल्या डबे इ. उपस्थित कर्मचारी -श्री. जे. के. चौधरी आ. निरीक्षक, श्री. प्रविण गिरासे श्री. दिनेश कोळी, श्री. प्रदिप चित्ते, श्री.राकेश भारती, श्रीमती पुनम चौधरी, सुशीला माळी व आशा वर्कर आदी.
हिवताप मुक्त गाव – निरोगी भविष्याची आपली जबाबदारी.
डासांना थारा नको, हिवतापाला वाव नको!
ताप आल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.














