शिंदखेडा नगरपंचायत स्थायी समितीच्या सभेला ग्रहण – नगराध्यक्षा माळीसह नगरसेवक तर भाजपात जुपंली
👉 अजेंडयात विषय नमुद करा अशी भुमिका भाजपाची, अन्यथा जिल्हाधिकारी कडे दाद मागणार 👉 उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील सह नगरसेवकांचा इशारा. ✍️. शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत) :-

👉 शिंदखेडा शहरातील विविध विकास कामांना विरोध नाही परंतु स्थायी समितीमध्ये विषयाला मंजुरी घेताना अजेंडयावर मात्र विषय नमूद केलेले असले पाहिजे अशी भूमिका भाजपाच्या सर्वच विषय सभापती सह नगरसेवकांची आहे. त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांनी भाजपाच्या नगरसेवकांवर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून अजेंडात विषय का नमूद केले जात नाही असा प्रश्न उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
शिंदखेडा येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तसेच स्थायी समितीची सभा ही नियमानुसार आणि सर्वसाधारण सभा ही दरमहा व्हावी.आज दोन महिने झालेत. हयासाठी आम्ही भाजपचे सर्व विषय समिती सभापती व नगरसेवक धुळे जिल्हाधिकारी कडे संबधित विषयावर दाद मागणार असल्याचे बांधकाम सभापती मनोहर पाटील यांनी यावेळी सांगितले. विद्यमान नगराध्यक्षांनी 21 व 27 एप्रिल रोजी स्थायी समितीची सभा बोलावली होती. मात्र या सभेच्या अजेंडयावर सन 26 27 या आर्थिक वर्षाकरिता विविध विभागांसाठी दैनंदिन लागणाऱ्या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदांना मंजुरी देणेबाबत विचार विनिमय करणे असे विषय पत्रिकेवर असे नमूद केल्याने भाजपच्या सर्व विषय समिती सभापती सदस्यांनी या सभेला उपस्थिती दिली नाही. विविध (25-30)कामे म्हणजे काय असा सवाल यावेळी करण्यात आला. अजेंड्यावर विषय नसल्यामुळे स्थायी समितीत कामांना मंजुरी मिळत नाही. याशिवाय भाजपाच्या नगरसेवकांची विकास कामाबाबत विरोधी भूमिका असल्याचे विद्यमान नगराध्यक्षांतर्फे सांगितले जाते मात्र यात सत्यता नाही.दिशाभूल करणारे आहेत.विकास कामांना विरोध असता तर पहिल्या सर्वसाधारण सभेत तेरा विषयांना मंजुरी दिलीच नसती. गेल्या दोन महिन्या पासून सर्वसाधारण सभा देखील होत नाही. नियमानुसार सर्वसाधारण सभा दर महिन्याला होणे अपेक्षित आहे. भाजपाचे आदिवासी नगरसेवक असल्याने शबरी घरकुल योजनेतील 65 घरकुल मंजूर असताना देखील त्याची कामं थांबवण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी केला. याशिवाय नगराध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले आरोप पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे आहेत. फिल्टर प्लांट सफाई भाजपच्या सत्ता काळात वर्षातून चार वेळा केली जात होती. भाजपचे नगरसेवक नेहमीच शहरातील विकास कामांच्या सोबत आहे मात्र चुकीच्या कामांना विरोध असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला
उदय देसले उपनगराध्यक्ष, मनोहर पाटील बांधकाम सभापती, दादा मराठे पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी, चेतन परमार गटनेते प्रतिनिधी,
चंद्रकांत सोनवणे आरोग्य सभापती प्रतिनिधी, अबू तालिब कुरेशी महिला बालकल्याण सभापती प्रतिनिधी, सुयोग भदाणे नगरसेवक, गुलाब सोनवणे नगरसेवक प्रतिनिधी, संदीप राजपूत नगरसेवक प्रतिनिधी उपस्थित होते.

















