*शिंदखेडा शहरातील (रा.मा.क्र12) या रस्त्यावरील अतिक्रमण*
*काढणेस स्थगिती दया व दुतर्फा दहा मीटर एवढेच अतिक्रमण काढा व्यापारी असोसिएशन ची मागणी*
👉*सा. बा. विभाग यासह तहसीलदार, नगरपंचायत, पोलीस स्टेशनला निवेदन*
शिंदखेडा ( प्रतिनिधी ):-
👉 शिंदखेडा शहरातील सर्व लहान मोठे व्यापारी व रहिवाशांमार्फत शहरातील वरपाडे रोड शिवाजी चौफुली ते वरुळ रोड भगवा चौक न्यायालयीन परिसरातील रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस जाहीर केल्यानंतर 21 मे रोजी अंतिम मुदत दिल्याने सर्वच लहान मोठे व्यापारी व रहिवासी मध्ये घबराहट निर्माण झाली आहे आम्हाला संरक्षण मिळावे व पंधरा मीटर ऐवजी दहा मीटर रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात यावे तसेच यासाठी अतिक्रमण काढण्यासंदर्भात मुदत व स्थगिती मिळावी यासाठी शिंदखेडा नगरपंचायत, तहसीलदार, पोलीस स्टेशन सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.बी पवार यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनाद्वारे म्हटले आहे की, दिनांक 13/05/2026 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिंदखेडा यांनी सुकवद-शिंदखेडा- चिमठाणे- दुसाने या राज्यमार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील शिंदखेडा शहरातील अतिक्रमण काढणे बाबत नोटिसा दिल्या आहेत सदरच्या नोटिसीत सात दिवसाच्या आत अतिक्रमण रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस 15 मीटर पावेतो काढून घ्यावे असे नोटीसित म्हटले आहे सदरच्या नोटीस मिळताच आम्ही सर्व व्यापारी शिंदखेडा शहरातील रहिवाशांची झोप उडाली आहे वास्तविक पुढील महिन्यापासून मानसूनचे पावसाचे आगमन होणार आहे व 21/5/2026 रोजी अतिक्रमण काढण्याचे म्हटले आहे या तारखेला स्थगिती देण्यात यावी व 15 मीटरचे अंतर कमी करून जास्तीत जास्त 10 मीटर एवढेच करावे यावरच शिवपथ/ राजपथ करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे 15 मीटर अतिक्रमण काढण्यात आल्यास शिंदखेडा शहर भकास होईल. व्यापारी बांधवांचे व्यावसायिक फार मोठे नुकसान होईल त्यामुळे शिंदखेडा शहरातील व्यापारी सांस्कृतिक मंडळामार्फत खालील
मागण्यांच्या विचार करून योग्य निर्णय देण्यात यावा
ते असे
1) दिनांक 21/5/2026 या दिवशी अतिक्रमण काढण्याच्या कामास त्वरित स्थगिती मिळावी.
2) राज्यमार्ग क्रमांक 12 या शिंदखेडा शहरातील रस्त्यावर पंधरा मीटर ऐवजी 10 मीटर एवढाच शिवपथ तयार करून जागा मोकळी करावी.तसेच नुकसानीची भरपाई मिळावी.
3) वीस वर्षापासून भाजीपाला विक्रेते याच रस्त्यावर बसतात त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
4) शिंदखेडा शहराच्या (बायपास) आशापुरी देवी मंदिर मागील विरदेल रस्ता पर्यंत नवीन निर्माण करण्यात यावा.
यासह अतिक्रमण स्थगिती व शहरातील रस्त्याचे रुंदीकरण 10 मीटर एवढेच करून आम्हा व्यवसायिकांना व रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा ही आग्रहाची सर्व व्यापारी बांधवांतर्फे कळकळीची विनंती यावेळी केली आहे.हयाप्रसंगी
शिंदखेडा शहरातील सर्व व्यापारी बांधव व रहिवासी मध्ये रमेश शेठ टाटिया
,बाळकृष्ण बोरसे,रवींद्र शेठ लखोटे,डॉ. सुजय पवार, राजेंद्र तुळशीराम पाटील, सुभाषराव तलवारे,
री प्रकाश गोधवानी, साहेबराव मराठे, उल्हास देशमुख विनायक पवार, गोपाल मेडिकल गौरव मराठे कन्हैया लाल जैन शुभमचंद जैन आरिफ खान पठाण डॉ. राजेश शहा कैलास चौधरी सुरेश जैन चिंतामण मराठे अरुण परदेशी शपूर खाटीक संजय परदेशी राजेंद्र भदाणे निखिल शहा मयूर मेडिकल यासह शेकडो च्या संख्येने व्यापारी व रहिवासी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए बी पाटील व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानुसार 15 मीटर ऐवजी दहा मीटर अतिक्रमण काढण्यात यावे तसेच रस्त्यावरील अतिक्रमित भाजी मंडई दुकाने ही हटवण्यात यावी तसेच रस्त्याच्या मध्यावरील आपल्या स्तरावरून योग्य ते नियमानुसार मध्यंग काढण्यात यावा आणि 21 मे च्या काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणावर स्थगिती देऊन मुदतवाढ करण्यात यावी त्यानंतर उप अभियंता एबी पवार यांनी आपल्या सर्व भावना मी वरिष्ठांपर्यंत पाठवतो शेवटी निर्णय त्यांच्या हातात आहे माझ्या हातात काही नाही असे उत्तर त्यांनी यावेळी दिले त्यानंतर व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी चौफुली वरील भाजी मंडई धारकांना आवाहन केले की आपली दुकाने आपल्या जागेत त्वरित स्थलांतरित करून घ्यावी जेणेकरून रहदारीस बाधा होईल असे होऊ देऊ नका. अतिक्रमण पंधरा मिटर निघाल्यास आजच सर्व व्यापारी व रहिवासी रस्त्यावर येतील म्हणून शासन व प्रशासनाने हयाकडे लक्ष देवुन आमची आर्त हाकेला न्याय दया अशी विनंती व्यापारी वर्गाकडुन हयावेळी करण्यात आली.



















