सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण काढणेबाबतचा निघाला मुहूर्त
👉 शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता होणार मोकळा
👉 21 मे 26 रोजी अतिक्रमण काढण्याची अखेरची मुदत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (13 मे )बजावल्या नोटिसा
👉 रस्त्याच्या मध्यापासुन दोन्ही बाजुस १५ मीटर (५० फुट) ची हद्द येवढा रस्ता होणार मोकळा 
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
👉शिंदखेडा शहरातील बहुचर्चित असलेला मुख्य रस्ता अखेर मोकळा होणार याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिंदखेडा यांनी आज संबंधित वरपाडे चौफुली ते वरुड चौफुली ते न्यायालयीन इमारत या लांबीत या विभागाची रा.मा- 12 रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर जागा शासकीय आहे म्हणून या अतिक्रमित असलेल्या दोन्ही बाजूतील दहा मीटर काँक्रीट रस्ता करणे व त्यालगत फुटपाथ/ आर.सी.सी. पक्क्या गटारी करणे काम मंजूर आहे म्हणून या मॉडेल रस्त्यासाठी कच्चे वा पक्के स्वरूपाचे अतिक्रमित बांधकाम दिनांक 21/5/ 2026 पर्यंत स्वखर्चाने काढून घ्यावे त्यानंतर सदरील अतिक्रमित असलेले बांधकाम उपविभागा मार्फत काढण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल अशा प्रकारच्या नोटिसा आज दिनांक 13 मे रोजी संबंधित दुकानदार गाळेधारक व घरमालक यांना देण्यात आल्या त्यामुळे शहरात एकच तारांबळ उडाली आहे हे अतिक्रमण काढणे वाहतुकीच्या दृष्टीने योग्य असल्याचे सर्व सामान्य नागरिकांमध्ये चर्चा देखील सुरू आहे त्या संदर्भात नोटिसेत नेमके काय म्हणणे आहे ते पाहूया
उपरोक्त संदर्भ क्र.१ ते १० च्या नियमान्वये विषयांकित प्रकरणी शिंदखेडा गावातील वरपाडे चौफुली ते वरुळ चौफुली ते न्यायालयीन इमारत या लांबीत या विभागाची रामा-१२ रस्त्याची रस्त्याच्या मध्यापासुन १५.०० मीटर जागा शासकीय आहे.
शिंदखेडा शहरातील वाढलेली वाहतुक वर्दळ, रस्त्याची आवश्यकता, वेळोवेळी स्थानिक नागरिक, परिसरातील ग्रामस्थ यांचे मागणीनुसार या विभागामार्फत शिंदखेडा गावातील लांबीचे दुभाजकासह दोन्ही बाजुस १०.०० मीटर कॉक्रीट रस्ता करणे व त्यालगत फुटपाथ /आर.सी.सी. पक्क्या गटारी करणेचे काम मंजूर आहे.
मंजूर काम आय.आर.सी. मानकाप्रमाणे व वैशिष्टपूर्ण पद्धतीने कार्यान्वित करुन शिंदखेडा गावातील हा मॉडेल रस्ता तयार करावयाचा आहे. संदर्भीय शासन आदेश/निर्णय/परिपत्रक व कायद्यातील तरतुदी लक्षात घेता सदर रस्त्याची रुंदी ही रस्त्याच्या मध्यापासुन दोन्ही बाजुस १५.०० मीटर एवढी आहे. त्याकरिता रस्त्याच्या मध्यापासुन १५.०० मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या हद्दीत आपल्यातर्फे करण्यात आलेले कच्चे / पक्के स्वरुपाचे अतिक्रमणीत बांधकाम आपण दि.२१/०५/२०२६ ०५/२०२६ पर्यंत स्वखर्चाने काढून घ्यावे. दि.२१/०५/२०२६ पर्यंत आपणातर्फे अतिक्रमणीत बांधकाम काढणेबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे. अन्यथा रस्त्याच्या मध्यापासुन १५.०० मीटर पर्यंतचे आपण अनधिकृतपणे केलेले अतिक्रमणीत असलेले बांधकाम या उपविभागामार्फत काढण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल.
त्यावेळी संबंधीत बांधकामाच्या बाबतीत होणाऱ्या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील तसेच शासकीय खर्चाने काढण्यात आलेल्या अतिक्रमणीत बांधकामाच्या खर्चाची संपूर्ण रक्कम आपलेकडुन वसुल करण्यात येईल.
तरी रस्त्याच्या मध्यापासुन १५.०० मीटर पर्यंत रस्त्याच्या शासकीय हद्दीत असलेले आपले अतिक्रमणीत बांधकाम आपल्या स्तरावर काढून घेण्याची कार्यवाही करावी.
असे ए.बी. पवार उपविभागीय अभियंता शिंदखेडा यांनी बजावलेल्या नोटिसेतुन कळविण्यात आले.
👉
संदर्भ :-
१) मुंबई महामार्ग कायदा १९५५ मधील नियम क्र.२ व नियम क्र. २१ (a)
२) रस्ते विकास योजना सन १९६१-१९८१ अन्वये प्रमुख जिल्हा मार्ग-२३
३) रस्ते विकास योजना सन १९८१- २००१ अन्वये राज्य मार्ग क्र. ११
४) रस्ते विकास योजना सन २००१-२०२१ अन्वये राज्य मार्ग क्र. १२
५) साबांवि पुरक पत्र आरबीडी/१००१/७२/ रस्ते-७ दि.२१/०९/२००१
६) साबांवि शुद्धीपत्रक आरबीडी /१००१/७२/ रस्ते-७ दि.७/०१/२००२
७) महाराष्ट्र शासन नगर रचना विभाग शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१९/अनौसं-३६/१९/नवि-१३ दिनांक ०५/०८/२०१९
८) Govt. Circular -PWD No.SSR/६९५७-८ दि.२३/०५/१९५७
९) Toposheet of Survey & Govt. Of India -२०११
१०) Govt. of Maharashtra U.D.C.P.R. Maharashtra State ३०/०१/२०२२



















