शिंदखेडा येथे राकेश माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन.
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार प्रफुल्ल भाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेश माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज दि ५ आक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे.
आज संध्याकाळी ५ वाजता माळी वाडा, जनता नगर येथील जेष्ठ महिला आणि महिला भजनी मंडळींच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. सदर कार्यालय संत सावता माळी व्यायाम शाळेच्या जवळ सुरू करण्यात येत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कलाताई माळी, संत सावता माळी व्यायाम शाळेचे युवक, राकेश भाऊ माळी मित्र मंडळ उपस्थित राहणार आहेत.
या कार्यालयात विवीध शासकीय योजना, आरोग्य योजना, बँकांची कागदपत्रे अद्ययावत करण्याचे काम विनामूल्य करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी नागरिक, माता भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन राकेश माळी मित्र मंडळाने केले आहे















