शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणूक साठी पाचव्या दिवशी प्रथमच अपक्ष अर्ज दाखल सुनिता अरुण देसले यांनी दाखल केला प्रभाग क्रमांक सहा मध्ये अर्ज
शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी आज पाचव्या दिवशी मात्र एकमेव अपक्ष दाखल करण्यात आला प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुनिता अरुण देसले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आज पाचव्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला आहे सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे शिंदखेडा शहरात गांधीगिरी रूपाने खूप परिचित आहेत म्हणून त्यांच्या धर्मपत्नी सुनीता अरुण देसले यांनी आज दुपारी अडीच वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे यांच्या दाखल केला. हयावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर उपस्थित होते.अर्ज दाखल केल्यानंतर अरुण देसले यांनी प्रतिक्रिया देताना आपण प्रभाग क्रमांक सहा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करीत आहेत प्रभागातून जनतेचा कौल प्रतिसाद चांगला मिळत असल्याने ही अपक्ष उमेदवारी आम्ही करीत आहोत..शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उरले आहेत एकंदरीत किती अर्ज दाखल होतात हे सोमवारी अंतिम दिवशी कढणार आहे. ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा















