शिंदखेडा नगरपंचायत स्विकृत नगरसेवक पदी पत्रकार प्रा. दिपक माळी यांची निवड.
✍️शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवक पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा कलावती माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, विवेक डांगरी कर यांच्या उपस्थितीत पार पडली. सकाळी 11 ते 1:00 वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत होती त्यामुदतीत भाजपाकडून उदय अरुण देसले तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी अर्ज दाखल केले माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी माघार घेतली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रा. दीपक माळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. हयावेळी नगराध्यक्षा कलावती माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी पुष्पगुछ देवुन सत्कार केला.सदर निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घोषणाबाजी करीत जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राकेश माळी,अरुण देसले,सुभाष माळी, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, डॉ. इद्रिस कुरेशी, कैलास वाघ, चंद्रसिग राजपुत,मनिष माळी, जिभाऊ फुले, दिलीप पाटील, उमाकांत देसले, गजेंद्र भामरे,विक्की खाटीक यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाचे अकरा नगरसेवक सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कलावती माळी, पुष्पा गोपाळराव सोनवणे, अर्जुन रामसिंग भिल, रजुबाई सुभाष माळी, काँग्रेसचे कमलाबाई रवींद्र पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनीता अरुण देसले हे नगरसेवक सह एकूण सर्व 17 नगरसेवक सभेला उपस्थित होते.हयावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रा.दिपक माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गटनेते राकेश माळी सह नगरसेवक व पदाधिकारी व शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिंदखेडा शहर विकासासाठी, विकास कामासाठी सहकार्य करु माझी पहिल्याच टर्ममध्ये निवड झाल्याने नगराध्यक्षा कलावती माळी व गटनेते राकेश माळी सह पदाधिकारीचे विशेष आभार आपल्या मनोगतात मानले. शिंदखेडा नगरपंचायतीवर पहिल्यांदा जेष्ठ पत्रकार म्हणून प्रा. दिपक माळी यांची स्विकृत नगरसेवक पदावर वर्णी लागल्याने पत्रकारांनी विशेष आनंद व्यक्त केला.
















