Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदीपात्रातील वाळू ठेका देण्याची कारवाई थांबवावी यासाठी...

शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदीपात्रातील वाळू ठेका देण्याची कारवाई थांबवावी यासाठी ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन.  ✍️शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (यादवराव सावंत)

शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदीपात्रातील वाळू ठेका देण्याची कारवाई थांबवावी यासाठी ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन.                                                          ✍️शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदीपात्रातील वाळू उपसा करणे बाबतचा ठेका देण्याबाबत ही कारवाई महसूल स्तरावरून या चालू वर्षी करण्यात येत आहे परंतु वरपाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सदर तापी नदीपात्रातील वाळू उपसा करण्याच्या ठेक्याच्या कारवाईस तीव्र विरोध आहे सदर ठेका देण्याची कारवाई त्वरित स्थगीत करावी यासाठी वरपाडे शिवारातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिंदखेडा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदनातून मागणी केली आहे. सदर निवेदनाद्वारे वरपाडे गावाच्या पाच किलोमीटर आतील तापी पात्रात यापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील आच्छी, हिसपुर येथे तीन तीन वेळा तसेच अमळथे येथे दोन वेळा अक्कळसे येथे तीन वेळा तर शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे तीन वेळा लोंढरे येथे दोन वेळा असे एकूण 16 वेळेस तापी नदीतील वाळू उपसा करण्याबाबतचा ठेका यापूर्वी साधारण दहा वर्षाच्या आत दिला गेला आहे व सदर वाळु ठेक्यामुळे वारेमाप वाळु उपसा करण्यात आलेला आहे व त्यामुळे हा काही काठावरील गावांना भविष्यात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते यापूर्वी सन 2017-18 यावर्षी वरपाडे गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता त्यावेळेस मात्र तहसील कार्यालयाने टँकर ने पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दाखवली होती तसेच वाळू उपसामुळे अनेक प्रकारचे नुकसान व त्रासाला सामोरे जावे लागते यापूर्वी देखील वाळू उपसा मुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे वरपाडे गावात गॅस्ट्रोची लागण झाली होती त्यावेळी खराब रस्त्यामुळे वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे सुमारे 30 रुग्ण दगावले होते वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांचे जीवनमान खालावेल त्यांना त्यांची शेतजमीन यांची घरेदारे गाव व आपली माणसे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही त्यामुळे नागरिकांचे जीवनमान संपुष्टात आणण्याचा शासनाचा व प्रशासनाचा इरादा तर नाही याची शंका होणे अनुचित ठरणार नाही म्हणून वरपाडे ग्रामपंचायतीने त्यांच्या ग्रामसभेत तापी नदी पात्रातील वाळू ठेका देण्यास शासनाच्या व प्रशासनाच्या धोरणास एकमुखी विरोध दर्शवला असून तसा ग्रामसभेचा ठराव ही ग्रामपंचायतीने शासन दरबारी महसूल दप्तरी पोहच केलेला आहे तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय धुळे यांच्यामार्फत दि 18/ 11/ 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी धुळे कार्यालय येथील आयोजित वाळू घाटाच्या पर्यावरण विषयक जाहीर जनसुनवाईस वरपाडे ग्रामस्थांनी ही आक्षेप घेऊन सदरच्या वरपाडे येथील तापी नदीपात्रातील ठेक्याबाबत पर्यावरणाबाबतचे तीव्र आक्षेप व वस्तुस्थिती विशद करून पर्यावरणाची व पर्यायाने वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याची होणाऱ्या हानीबाबत लेखी हरकत घेऊन तिव्र आक्षेप नोंदविला आहे तसा कागदपत्री पत्रव्यवहार प्रशासकीय व शासनाच्या महसूल दप्तरी उपलब्ध आहे तरी सदर निवेदनाची दखल प्रशासनाने घेऊन आम्हा पंचक्रोशीतील रहिवासी नागरिकांना दिलासा देऊन सदर वरपाडे येथील तापी नदीपत्रातील प्रस्तावित वाळु घाट लिलाव प्रक्रिया थांबवुन सदर प्रक्रिया रद्द करावी व आम्हालाही भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य उपभोगु द्यावे तसे न झाल्यास आम्हाला तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन करणे भाग पडेल याची दखल शासन व प्रशासनाने घ्यावी. पुढील होणाऱ्या परिणामास जबाबदार प्रशासन राहील असा इशारा यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सदरचे निवेदन लवकरच धुळे जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून सविस्तर माहिती सह सादर करण्यात येणार आहे नियोजन देताना एडवोकेट वसंत पाटील,रामराव पवार, दीपक पवार, नथ्थु पवार, प्रवीण गिरासे, दगडू पाटील, नंदलाल पवार, ज्ञानेश्वर खैरनार, रमेश मोरे, सचिन पवार, जयवंत पवार, कुणाल गिरासे, विशाल जाधव, प्रकाश पवार, करण कोळी, समाधान कोळी, साहेबराव पवार ,प्रदीप चित्ते, मकेसिंग गिरासे,भागवत जाधव, विजय पवार यांसह शेकडो ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीसह निवेदन सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777295508.2f6737a8 Source link

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.   ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक...

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.                                 ...

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.                                 ...

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  👉 शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777277440.41c0ef3 Source link

error: Content is protected !!