शिंदखेडा- जनता हायस्कूलच्या विद्यार्थिनीचे विभागस्तरावर निवड- धुळे जिल्ह्यात गोळाफेक मैदानी स्पर्धेत सुवर्णा भिल प्रथम ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित धुळे जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा दि. ६ ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे संपन्न झाली असून सदर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थिनी सुवर्णा भिल हिने वयोगट 17 वर्ष आतील मुली गोळाफेक ह्या मैदानी स्पर्धेत धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत नाशिक विभास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे
सदर मैदानी स्पर्धेतील विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षिका एन. जे. देसले व उपशिक्षक जतीन बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले होते याप्रसंगी सदर विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला
सदर मैदानी स्पर्धेतील यश प्राप्त बिद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व संस्थेचे सर्व जेष्ठ संचालक मंडळ तसेच प्राचार्य एस. एस. पाटील, पर्यवेक्षक बी जे पाटील, जेंष्ठ शिक्षक एस के जाधव, डी एच सोनवणे, एस ए पाटील व वरिष्ठ लिपीक किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक करत पुढील विभागस्तरिय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या















