शासकीय रेखाकला (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) परीक्षेला बुधवार पासून प्रारंभ. 👉 एम. एच. एस. एस. हायस्कूल शिंदखेडा येथे होणार परीक्षा
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत )-: शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा एम एच एस एस हायस्कूल शिंदखेडा येथे चार दिवस होणार आहे. 1)एलिमेंटरी परीक्षा:-दि.24/09/25 बुधवारी वस्तुचित्रचा पेपर 10.30 ते 1.00 या वेळात तर स्मरणचित्रचा पेपर दुपारी 2 ते 4 या वेळात होईल. दि 25/09/25 गुरुवारी संकल्पचित्र चा पेपर सकाळी 10.30 ते 1.00 तर भूमिती व अक्षरलेखन चा पेपर दुपारी 2 ते 4 दरम्यान होईल. 2)इंटरमिजिएट परीक्षा:- दि.26/09/25 शुक्रवारी वस्तुचित्र चा पेपर 10.30 ते 1.30 या वेळात व स्मरण चित्र 2.30 ते 4.30 या वेळात होईल. दि. 27/09/25 शनिवारी संकल्पचित्र 10.30 ते 1.30 या वेळात तर भूमिती व अक्षरलेखन चा पेपर 2.30 ते 5.30 या वेळात होईल. रेखाकला परीक्षेसाठी एकूण 603 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सर्व परीक्षार्थींनी वेळेवर परीक्षा केंद्रात हजर रहावे. असे आवाहन प्राचार्य तथा केंद्रसंचालक टी. एन पाटील यांनी केले आहे.















