Homeताज्या बातम्याविनोदाने माणसाच्या जगण्याला दिशा देण्याचे मोठे कार्य केले आहे प्राचार्य संजीव गिरासे...

विनोदाने माणसाच्या जगण्याला दिशा देण्याचे मोठे कार्य केले आहे प्राचार्य संजीव गिरासे : हरि रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन

विनोदाने माणसाच्या जगण्याला दिशा देण्याचे मोठे कार्य केले आहे
प्राचार्य संजीव गिरासे :                                    👉 हरि रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन.                                                         ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
धुळे – माहिती, तंत्रज्ञान व मोबाईलच्या काळात माणूस एका आभासी जगात वावरत आहे. झपाट्याने बदलत्या काळात नोकरी, व्यवसाय, उद्योग, धंद्यात ही मोठे बदल होत असल्याने मानसिक दृष्ट्या ही विशिष्ट प्रकारचा मनावरचा ताण वाढत आहे. या ताणतणात जगणं आभासी पद्धतीने अवघड होत आहे. बदलत्या जीवनशैलीत विनोदाने माणसाच्या जगण्याला दिशा देण्याचे मोठे कार्य केले आहे, असे मत प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांनी व्यक्त केले.
गिरड ता. भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष हरी रावजी पाटील यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त ज्ञान शिस्त व अनुशासन सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी साहित्यिक प्राचार्य डॉ. संजीव गिरासे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष, प्रतापराव हरी पाटील, सौ. डॉ. पूनमताई प्रशांतराव पाटील, उपप्राचार्य सोनगीर महाविद्यालय, प्रा. डॉ. आर. के. जाधव, उपाध्यक्ष, शिवाजीराव आत्माराम पाटील, भास्करराव माधवराव पाटील, राजेंद्र पाटील, विनोद मनोरे, उपमुख्याध्यापक, बी. एन. पाटील, पर्यवेक्षक, एन. व्ही. सावंत, रामकृष्ण धनगर, उत्तमराव पाटील, आदींची प्रमुख उपस्थित होती. दीप प्रज्वलन तथा प्रतिमेचं पूजन करून हरी रावजी पाटील यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक कार्याला अभिवादन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांना बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी तथा पालकांशी संवाद साधताना प्राचार्य गिरासे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या काळ हा कसोटीचा आहे. जितकी जास्त गुणवत्ता तेवढे जास्त प्राधान्य सर्व क्षेत्रात मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुणवत्ता संपादन करावी. परिश्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक डॉक्टर आर के जाधव यांनी जीवन जगण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञानाचा उपयोग आपण आत्मसात करावा, निश्चित यशस्वी जीवन जगता येईल. संघर्ष हा नितीने, न्यायाने आणि संविधानिक पद्धतीने केला तर मिळणारे यश हे कायमस्वरूपी टिकणारे असते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. प्रवीण मनोरे प्रा.दिनेश भोसले दीपक हिरे नारायण भागवत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक.. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री बी एन पाटील यांनी केले सूत्रसंचालन सचिन बोरसे आभार रमेश धनगर. यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!